भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात RSS चं योगदान नव्हतं,… – विद्याताई चव्हाण

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात RSS चं योगदान नव्हतं,… – विद्याताई चव्हाण

लोकांमध्ये भांडणे लावून सत्तेची मलई खायचे काम भाजप करत आहे. त्यांचे हिंदुत्व ढोंगी असून, संत परंपरेला नख लावण्याचे काम भाजप करत आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आरएसएसचे योगदान नव्हते. ते इंग्रजांना साथ देत होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण (NCP Mahila Aghadi State President Vidya Chavan) यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षाची नियुक्ती लवकरच करायची आहे. समाजकारण करणाऱ्या अनेक महिला राष्ट्रवादीत कार्यरत आहेत. त्यांच्यातून सक्षम व पक्षासाठी वेळ देणाऱ्या महिलेलाच या पदावर संधी मिळेल. सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह अनेक महापालिकेच्या निवडणुकीत भाजप पैशांचे वाटप करीत आहे असा गंभीर आरोप विद्याताई चव्हाण यांनी केला. संभाव्य मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पैसे वाटण्याची तयारी भाजपने केली आहे. भाजपच्या बारामती मिशनविषयी त्या म्हणाल्या, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे तेथे मोठे योगदान आहे. तेथे पंतप्रधान मोदी निवडणुकीला उभे राहिले, तरी काही फरक पडणार नाही. त्यांनी मताला एक लाख रुपये दिले, तरी बारामती राष्ट्रवादीमुक्त होऊ शकत नाही’,असेही त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी महिला पदाधिकारी निवडीसाठी मुलाखती घेण्यासाठी विद्याताई चव्हाण साताऱ्यात आल्या होत्या. यावेळी राष्ट्रवादी भवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात महागाई, बेरोजगारी हे महत्त्वाचे मुद्दे असून, त्या विरोधात महिला राष्ट्रवादीतर्फे लवकरच राज्यभर जिल्हास्तरीय विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा विद्याताई चव्हाण यांनी दिली.

हे ही वाचा:

हिंदूसह मुस्लिम बांधवदेखील करतात पाकिस्थानातीत ‘या’ देवीचा पूजा

रामदास कदम यांच्या विरोधात पुण्यात शिवसेना आक्रमक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version