Sunday, July 7, 2024

Latest Posts

RSS ची BJP ला चपराक, ‘Ajit Pawar यांना सोबत घेऊन स्वतःची किंमत कमी करून घेतली…

नुकतेच लोकसभा निवडणूक २०२४ (Loksbha Election 2024) चे पर्व पार पडले. यावर्षीच्या निवडणूक काहीशा रंजक पण चुरशीची लढत देणाऱ्या ठरल्या. अनेकांचे पक्ष बदल झाले तर अनेकांचे पक्ष फुटले. बारामतीसारख्या मोठ्या मतदारसंघात अनेक बदल झाले.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूक २०२४ (Loksbha Election 2024) मध्ये देशभरातून एनडीए आघाडीला (NDA Alliance) बहुमत मिळाले. त्यानुसार त्यांनी सत्तास्थापन देखील केली. परंतु, महाराष्ट्रात भाजपसह (BJP) महायुतीला (Mahayuti) अपेक्षित यश प्राप्त झाले नाही. त्यामुळे भाजपची पितृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) यांनी भाजपवर ताशेरे ओढले आहेत. आरएसएस सदस्य रतन शारदा (Ratan Sharada) यांनी भाजपवर टीका करत अजित पवार (Ajit Pawar) यांना सोबत घेऊन भाजपने फार मोठी चूक केली असल्याचे म्हंटले आहे.

नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आजीवन सदस्य रतन शारदा  यांनी एक लेख लिहला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल भाजपला वास्तवाची जाणीव करून देणारा असल्याचं त्यांनी ‘मोदी ३.०: कन्वरसेशन फॉर कोर्स करेक्शन’ असा शीर्षक असलेला लेखात उल्लेख केला आहे. तसेच या लेखात अजित पवारांना सोबत घेतल्याची किंमत ही भाजपला (BJP) मोजावी लागणार असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे. भाजप आणि शिंदे गटाचे बहुमत महाराष्ट्रात असताना देखील अजित पवार गटाला सोबत घेतले. यामुळे कित्येक वर्ष काँग्रेसी विचारधारेच्या विरोधात लढणाऱ्या भाजपच्या साम्रठकांना धक्का बसला. या एका कारणामुळे भाजपने स्वतःची किंमत कमी करून घेतली. अशी टीका रतन शारदा यांनी केली. या निवडणुकीमध्ये भाजपला तब्बल २४ जागांचा फटका लागला असून याचे कारण देखील फोडाफोडीचे राजकारण असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

नुकतेच लोकसभा निवडणूक २०२४ (Loksbha Election 2024) चे पर्व पार पडले. यावर्षीच्या निवडणूक काहीशा  चुरशीची लढत देणाऱ्या ठरल्या. अनेकांचे पक्ष बदल झाले तर अनेकांचे पक्ष फुटले. बारामतीसारख्या मोठ्या मतदारसंघात अनेक बदल झाले. पवार विरुद्ध पवार असा सामना तिथे रंगलेला पाहायला मिळाला. राष्ट्रवादी (NCP) गटाचे अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीमध्ये जाऊन सामील झाले. भाजपमध्ये सामील झाल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून अजितदादांनी आपली पत्नी म्हणजेच सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना उमेदवारी दिली होती. परंतु बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सुनेत्रा पवार यांचा दरारून पराभव केला. एवढंच नाही तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने लढवलेल्या मतदारसंघातून कोणीच निवडून आले नाही. फक्त रायगड विभागातून सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांचा विजय झाला. अजित पवारांनी लढवलेल्या ३ जागांपैकी फक्त १ जागा त्यांना मिळाली. आणि यात भाजपचा देखील तोटा झाला. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) देखील या गोष्टीवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा:

Bai Ga चित्रपटाचं पहिलं गाणं आऊट, प्रेक्षक अनुभवणार ‘जंतर मंतर’ ची जादू

बारामतीत ‘दादा’ विरुद्ध ‘दादा’ सामना होणार ? Sharad pawar यांचा नातू राजकारणात येण्याच्या तयारीत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss