spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे आरटीआयमधून समोर आलं आहे ; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर टीका

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ हजार रोजगार देण्याचा देशव्यापी कार्यक्रम सध्या राबवण्यात येणार आहे. हाच कार्यक्रम महाराष्ट्रातही राबवण्यात येत असून त्या अंतर्गत आज पहिल्या टप्प्यातील नियुक्तीपत्र देण्यात येत आले. त्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी संवाद साधला. तसंच राज्यात अनेक नवे उद्योग आणत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

वेदान्त फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. एकीकडे विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करत असताना दुसरीकडे हे प्रकल्प महाविकास आघाडीच्या कार्यकाळातच गेल्याचा दावा सरकार करत आहे. “दोन-तीन प्रकल्प कुठे गेले हे आरटीआयमधून समोर आलं आहे. त्यातून सत्य समोर येईल. प्रकल्प का गेले? कोणामुळे गेले? कधी गेले? हे समोर येईल. उपमुख्यमंत्र्यांनीही पुराव्यानिशी मांडलं आहे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसंच आम्ही नवे उद्योग आणत असून त्यात राज्याचं हित आहे. यामुळे राज्यातील तरुणांना फायदा होईल, राज्य स्वयंपूर्ण होईल,” असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

“केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी आहे. राज्याला केंद्राकडून विकासासाठी निधी मिळत आहे. गेल्यावेळी प्रस्ताव पाठवला असता १४ हजार कोटी मंजूर करण्यात आले. एक रुपयाही कमी केला नाही,” अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. “सरकार बदल्यानंतर चैतन्य आलं आहे. सर्व सण साजरे होत असून आनंदाचा शिधाही पोहोचला. पण काही ठिकाणी पोहोचला नाही म्हणून लगेच त्याच्यावर बोट ठेवण्यात आलं. राज्यात एक नकारात्मकपणा होता, त्यात सकारात्मकपणा आणला आहे. आम्ही दोघं असताना धडाधड निर्णय घेतले. हे गतिमान सरकार आहे,” असंही ते म्हणाले. “वर्षभरात ७५ हजार रिक्त पदं भरली जातील. नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न आहे,” असंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा :

प्रताप सरनाईकांना मोठा झटका; ११ कोटींची संपत्ती होणार जप्त

सुषमा अंधारे यांचा मोठा दावा; शिंदे गटातील ‘हा’ आमदार आमच्या संपर्कात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss