spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अब्दुल सत्तारांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही ; रुपाली ठोंबरे

शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ दिल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. तर यावरून आता सर्वच स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही अब्दुल सत्तार यांना इशारा दिला आहे. माफी मागितली तरीही सत्तारांना आम्ही राज्यात फिरू देणार नाही, असे त्या म्हणाल्या.

राज्यभरातून होणाऱ्या विरोधानंतर अब्दुल सत्तारांची माफी; ‘स्वारी म्हणतो, शब्द मागे घेतो’

शिंदे सरकारमधील मंत्री सातत्याने राजकारणातील महिलांविषयी सातत्याने अपशब्द वापरत आहेत. आज अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपशब्द वापरले आहेत. अब्दुल सत्तार आपण किती दलिंदर विचारांचे आहात. आपण मंत्री होण्याच्या पात्रतेचे आहात का? आपण जाणूनबुजून महिलांबाबत जे बोलता हे महाराष्ट्रासाठी घातक आहेत. तुम्ही माफी जरी मागितली, तरी यापुढे तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. तुमची मंत्री होण्याची लायकी नाही. तुम्ही राजीनामा दिला पाहिजे”, अशी संतप्त प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

Abdul Sattar : अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह भाषेतील टीकेवर, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रात अब्दुल सत्तार यांच्यासारखे नेते महिलांविषयी काहीही बोलतात. तरीही ते मंत्रिपदावर राहतातच कसे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात बसू देणार नाही, असा इशाराच विद्या चव्हाण यांनी दिला आहे. तसेच शिंदे गटाचे तीन मंत्री सध्या आमच्या रडारवर आहेत. रवींद्र चव्हाण हे भायखळ्यातील एका बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले होते. तर गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांनी महिलांचा अवमान करणारी वक्तव्य केली आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने या तिघांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही विद्या चव्हाण यांनी केली.

काय म्हणाले होते सत्तार?

औरंगाबादच्या सिल्लोड येथे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठी अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात आहे. याचवेळी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर सत्तार यांनी टीका केली. आम्हाला खोके म्हणणारे लोक भि**** असल्याचं सत्तार म्हणाले. तर सुप्रिया सुळे यांचा देखील सत्तार यांनी असाच उल्लेख केला. विशेष म्हणजे एकदा नाही तर दोनवेळा सत्तार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं.

छगन भुजबळ यांची प्रकृती ढासळली; रुग्णालयात केलं दाखल

Latest Posts

Don't Miss