spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राहुल शेवाळेंच्या आरोपाला रुपाली ठोंबरेंच प्रतिउत्तर

सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापल्याचं दिसून येत आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंनी (Rahul Shewale) पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमागे एका राष्ट्रवादी महिला नेत्याचा (Nationalist women leaders) समावेश असल्याचा आरोप केला. तसेच तक्रारदार महिलेला फुस लावली जात आहे, असाही दावा शेवाळेंनी केला. त्यांच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी प्रत्युत्तर दिलं. “तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात शेण खाल्लं आणि आता सरळ दुसऱ्यावर आरोप करत आहात. तुम्हाला लाज कशी वाटत नाही?” असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी केला. त्या माध्यमांशी बोलत होते.

राहुल शेवाळे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी आणि युवासेनेवर (Nationalist and Yuva Sena) गंभीर आरोप केले आहेत. या सर्व आरोपांना राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रत्युत्तर दिलं. राहुल शेवाळे यांची पूर्ण पत्रकार परिषद मी ऐकली नाही. मात्र त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये युवासेनेवर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादीचा दाऊदशी संबंध जोडला आहे. ते हा सर्व पोरखेळ सुरू असल्यासारखं बोलले आहेत. एक खासदार सत्तेचा गैरेवापर कसा करतो याचं उत्तम उदाहरण म्हणेज राहुल शेवाळे आहेत. या महिलेच्या जीवाला धोका आहे. खासदार असताना महिलेला सक्षम केलं पाहिजे, मात्र त्रास दिला जात आहे. आमच्याकडे ४० पानांचा पुरावा आहे, मात्र मीडिया ट्रायल चालवणारी मी वकील नाही, हे सगळं कोर्टात चाललं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. मात्र तुम्हाला हाऊस असेल तर आम्ही हे सर्व पुरावे मीडियासमोर देखील दाखवू असा इशारा रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिला आहे.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या आरोपानंतर आता राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. माझ्यावर ज्या महिलेने आरोप केले, त्या महिलेसोबत माझं कोणतंही रिलेशनशिप नव्हतं असं शेवाळे यांनी म्हटलं आहे. तसेच ज्या महिलेने आरोप केले त्या महिलेचं कुटुंब गुन्हेगारी पार्श्वभूमीचं असल्याचा आरोपही राहुल शेवाळे यांनी केल आहे. तसंच या महिलेचं पाकिस्तान (Pakistan) कनेक्शन असल्याच दावा देखील त्यांनी केला.

हे ही वाचा : 

Team India ला विजय मिळवून देत R Ashwin ने केला मोठ्ठा पराक्रम!

Kullu Paragliding Accident कुल्लू येथे पॅराग्लायडिंग करताना पुण्यातील पर्यटकाचा मृत्यू

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

 

Latest Posts

Don't Miss