Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Rutuja Latke : कोर्टाच्या निर्णयानंतर ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया…

ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. उद्या ११ वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला. कोर्टाच्या या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. न्याय देवतेकडून मला न्याय मिळाला आहे. माझा न्यायदेवतेवर पुर्णपणे विश्वास होता.

ऋतुजा लटके यांना मुंबई हायकोर्टानं मोठा दिलासा दिला आहे. उद्या ११ वाजेपर्यंत लटके यांचा राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या असा आदेश हायकोर्टानं मुंबई महापालिकेला दिला. कोर्टाच्या या निर्णयानंतर ऋतुजा लटके यांनी माध्यमांशी संवाद साधला. न्याय देवतेकडून मला न्याय मिळाला आहे. माझा न्यायदेवतेवर पुर्णपणे विश्वास होता. अशी पहिली प्रतिक्रीया लटके यांनी दिली.

हे ही वाचा : मोठी बातमी Andheri bypoll Election ! ऋतुजा लटकेंचा उमेदवारीचा मार्ग मोकळा

न्याय देवतेकडून मला न्याय मिळाला आहे. माझा न्यायदेवतेवर पुर्णपणे विश्वास होता. त्यामुळे मी कोर्टात धाव घेतली होती. आज सुनावणी झाली. त्याप्रमाणे मला न्याय देवतेकडून न्याय मिळाला आहे. जसे माझे मिस्टर रमेश लटके यांनी जे कार्य केलेलं आहे. त्याचा जो वारसा आहे तो पुढे घेऊन जाणार आहे. अशी पहिली प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली आहे. तसेच पालिकेकडून भ्रष्टाचाराचा आरोप केला यावर तुमचं मत काय विचारल असता, लटके यांनी अधिक बोलेने टाळले, मला याबद्दल काही कल्पना नाही. तुम्ही यासंदर्भात वकिलांशी बोलू शकता अशी प्रतिक्रिया लटके यांनी दिली आहे. तसेच मला कोर्टात मला जायचं नव्हत पण नाईलाजास्तव मला जायला लागलं. उद्या अखेरची तारीख आहे. मी अर्ज भरणार आहे. कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार राजीनामा मिळाला की मी अर्ज भरायला जाणार आहे. आणि मशाल या चिन्हावरुनच मी निवडणुक लढवणार आहे. असे देखील ऋतुजा लटके यांनी स्पष्ट केलं.

ऋतुजा लटके आणि मुंबई महापालिका अशा दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर हायकोर्टानं दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास आपला निकाल दिला. हायकोर्टानं थेट मुंबई महापालिकेला आदेश दिला की, उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत लटके यांना राजीनामा स्विकारल्याचं पत्र द्या. या परिस्थितीत आम्हाला हस्तेक्षेप करावा लागत आहे, अशी टिप्पणीही यावेळी हाकोर्टानं निर्णय देताना केली.

हे ही वाचा :

Rutuja Latke : मनपाचा ऋतुजा लटकेंना झटका, भ्रष्टाचाराचे आरोप करत हायकोर्टात युक्तिवाद सुरूच

नेत्यांनाच खुश करायचं असेल तर बंद खोलीत… – रोहित पवारांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss