Tuesday, July 2, 2024

Latest Posts

Ambadas Danve यांचं निलंबन दुर्दैवी, विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा डाव: Sachin Ahir

शिवसेना उबाठा विधानपरिषद आमदार आणि विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना प्रसाद लाड (Prasad Lad)  यांना केलेली शिवीगाळ भोवली असून आज (मंगळवार, २ जून) विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित केले आहे. तसेच त्यांना पाच दिवसांसाठी विधान भवन (Maharashtra Vidhan Bhavan) परिसरात फिरकण्यासदेखील बंदी घालण्यात आली आहे. यावर आता विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून शिवसेना उबाठा आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी यावर टीका करत, “५ दिवस निलंबन करणं हे दुर्दैवी असून विरोधी पक्ष नेत्यांचा आवाज बंद करण्याचा डाव होत आहे,” असा आरोप केला आहे.

आज विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावर निर्णय घेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसासाठी निलंबित केले आहे. तसेच निलंबन पूर्ण होईपर्यंत विधानभवन परिसरात फिरकण्याससुद्धा अंबादास दानवेंवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडीमधील नेते आक्रमक झाले आहेत. यावर सचिन अहिर म्हणाले, ” एकाप्रकारे विरोधी पक्ष नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. एकतर्फी संपूर्ण काम करण्याचा प्रयत्न होत आहे यचा आम्ही निषेध करतो. सर्वं सभा त्याग करून बाहेर पडले आहेत. विरोधी पक्षनेते, प्रमुख नेते आणि गटनेते यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. यावर काय निर्णय घ्यायचा ते या बैठकीत घेण्यात येईल. ५ दिवस निलंबन करणं हे दुर्दैवी आहे. ५ दिवस विरोधी पक्ष नेत्यांचा आवाज बंद करण्याचा डाव होत आहे. एकतर्फी चालू असलेली दादागिरी होऊ देणार नाही,” असे ते म्हणाले.

लोकसभेत काल (सोमवार, १ जून) काँग्रेस नेते आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे भाषण पार पडले. त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) त्यांनी भाजप (BJP) आणि आरएसएसवर जोरदार टीका करत “जे स्वतःला हिंदू म्हणवतात ते २४ तास हिंसा-हिंसा-हिंसा…द्वेष-द्वेष-द्वेषात गुंततात… तुम्ही मुळीच हिंदू नाही,” असे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या भाष्यावरून विधानपरिषदेत (Maharashtra Assembly Monsoon Session) गोंधळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. आणि याचा शेवट शिवीगाळ करून झाला. भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांना शिवसेना उबाठा आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिवी दिल्यामुळे विधिमंडळाचे कामकाज स्थगित करण्यात आले होते.

हे ही वाचा:

हे सरकार सामान्यांचे नाही तर मलिदा खाणाऱ्यांचे सरकार, आमदार रोहित पवार

Ambadas Danve यांना शिवीगाळ भोवली; पाच दिवसांसाठी विधान परिषदेतून निलंबित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss