Monday, July 8, 2024

Latest Posts

मुंबईकरांमध्ये मराठी – परप्रांतीय द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना सुबुद्धी येवो, Congress नेते Sachin Sawant यांचा टोला

ज्य सरकारने (Maharshtra Government) वर्ल्ड्कप विजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात (Maharashtra Vidhansabha) सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टी २० वर्ल्डकप (T20 World Cup 2024) विजयानंतर भारतीय क्रिकेट संघाच्या  विजयी परेडमध्ये (Indian Cricket Team Victory Parde) लाखो मुंबईकरांनी मरिन ड्राईव्ह येथे अफाट गर्दी केली होती. विश्व विजेते झालेल्या आपल्या लाडक्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी मुंबईकरांनी तुफान गर्दी केली होती. नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट हॉटेल पासून निघालेली हि विजययात्रा वानखेडे स्टेडियम पर्यंत पोहोचली. यातच आज (शुक्रवार, ५ जुलै) राज्य सरकारने (Maharashtra Government) वर्ल्ड्कप विजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधिमंडळात (Maharashtra Vidhansabha) सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

वर्ल्डकप विजेते मुंबईकर खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमार यादव(Suryakumar Yadav), शिवम दुबे (Shivam Dube) आणि यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) यांचा आज विधिमंडळात सत्कार करण्यात येणार आहे. त्यावर आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून प्रतिक्रिया देत ते म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देशाला गौरव मिळवून देणाऱ्या आपल्या लाडक्या रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या मुंबईकरांचा सत्कार करण्यात येणार आहे याचा आनंद आहे. समस्त मुंबईकर काल या आपल्या हिरोंच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते आणि सर्वांनी आनंदोत्सव साजरा केला.”

ते पुढे म्हणाले, “या मुंबईच्या सुपुत्रांपैकी सूर्यकुमार यादव याचा जन्म गाझीपूर उत्तर प्रदेश आणि यशस्वी जैस्वाल याचा जन्म भदोई, उत्तर प्रदेश चा आहे. मुंबई स्वप्ननगरी आहे. यशस्वी चे यश हे ज्यांचा काही राजकीय पक्ष तिरस्कार करतात त्यांच्यापैकी एका फेरीवाल्याच्या स्वप्नांची पूर्ती आहे. शिवम दुबे याचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्याचे वडील हे भदोई उत्तर प्रदेश चे आहेत. मराठी उत्तम बोलणाऱ्या आपल्या लाडक्या रोहितची मातृभाषा तेलगू आहे. मुंबईच्या विकासासाठी व मुंबईचे नाव जगात मोठे करण्यासाठी मराठी माणसाच्या खांद्याला खांदा लावून इतर प्रांतातील लोकांनीही योगदान दिले आहे. तेही मुंबईकर आहेत याचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. आम्हाला तो आहेच!”

“मुंबईकरांमध्ये मराठी परप्रांतीय असे ध्रुवीकरणाचे, द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो! जे अशा पक्षाची सत्तेसाठी साथ घेतात अशा भाजपालाही सुबुद्धी प्राप्त होवो हीच या आनंदाक्षणी प्रार्थना!” असे ते म्हणाले.

World Cup जिंकलोय तर आपण नाचायला पाहिजे, Rohit Sharma ने दिली मराठीतून प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss