सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी पाठवायचे, शिंदे गटाचा गंभीर आरोप

सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी पाठवायचे, शिंदे गटाचा गंभीर आरोप

शिवसेना फुटी नंतर दोन्ही गटा मध्ये खरी शिवसेना कोणती यावर वाद पेटून निघाल्याचे दिसून येत आहे. भाजपाकडून ५० कोटी रुपये घेऊन सेनेतील आमदार शिंदे गटात गेल्याचा आरोप शिवसनेकडून करण्यात आला होता. पण आता यावर शिंदे गटातील बुलढाणा (Buldana News) लोकसभा मतदारसंघातील खासदार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी रुपये याचे असा गंभीर आरोप खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. गुलाबराव पाटील बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच जिल्ह्यात दाखल झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वागत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी खासदार प्रतापराव जाधव बोलत होते.

शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव बोलताना म्हणाले की, “५० खोके एकदम ओके म्हणताना शंभर खोके मातोश्री ओके तेही दर महिन्याला जात असत.” शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी थेट ठाकरेंवर आरोप केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. बुलढाण्याचेखासदार प्रतापराव जाधव यांनी आदित्य ठाकरेंवर (Aaditya Thackeray) निशाणा साधताना केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. कार्यकर्त्यांच्या वाळूच्या गाड्या पकडल्या आणि पत्त्यांच्या क्लबवर धाड पडली तर, वाईट काम असलं तरी आम्हालाच फोन करावा लागतो, असं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. आदित्य ठाकरे कधी पोलीस ठाण्याची पायरी चढले आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंनी काही आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आणि पक्षात दोन गट झाले. एक ठाकरे समर्थक आणि दुसरे शिंदे समर्थक. अशातच दोन्ही गटांमध्ये दररोज वेगवेगळ्या कारणांवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडत असतात. अशातच ठाकरे समर्थकांच्या ‘५० खोके एकदम ओके’ या घोषणेला प्रत्युत्तर देत प्रतापरावांनी ‘शंभर खोके एकदम ओके’ असं म्हणत ठाकरेंना जणू आव्हानच दिलं आहे.

५० खोक्यावरून शिवसेनेने रान पेटवले होते. विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून शिंदे गटावर निशाणा साधला होता. मात्र, यावरून शिंदे गटातून काहीच प्रत्युत्तर आले नव्हते. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला शांत बसण्याचं आवाहन केलं होतं, म्हणून आम्ही शांत होतो. पण जीवावर बेतलं की आम्ही बोलणारच असा इशाराही प्रतापराव जाधव यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या काळातील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना १०० कोटी रुपयांचं टार्गेट दिलं असल्याचा आरोप माजी पोलीस आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी पत्राद्वारे केला होता. त्यावरून अनिल देशमुख आणि सचिन वाझे सध्या पोलीस तुरुंगात आहेत. त्यावरूनच सचिन वाझे दर महिन्याला मातोश्रीवर १०० कोटी दर महिन्याला पाठवायचे असा आरोप प्रतापराव जाधव यांनी केला आहे.

हे ही वाचा:

मुंबईत शिवसेनेला खिंडार, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील ५०० कार्यकर्त्यांचा शिंदेंना पाठिंबा

मुंबई विमानतळ उडवून टाकण्याची धमकी, सुरक्षेत वाढ

Follow Us

Exit mobile version