दादरमध्ये शिंदे गटाचे प्रति सेनाभवन उभारले जाणार, सदा सरवणकरांनी दिली माहिती

दादरमध्ये शिंदे गटाचे प्रति सेनाभवन उभारले जाणार, सदा सरवणकरांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्रात संत्तातर झाल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट असे शिवसेनेचे नकळत दोन भाग झाले. त्यानंतर सत्तासंघर्ष सुरु झाला आणि सर्वोच्च न्यायालया पर्यंत हे प्रकरण गेलं. या चुरशीची लढाईत शिंदे गटाने नवा डाव खेळला आहे. दादर मध्ये असलेलं मूळ शिवसेना भवन अशाच पद्धतीचे प्रति सेनाभवन उभारण्यात येणार आहे. याची माहिती शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दिली.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी नवा डाव रचला आहे. एकनाथ शिंदे यांच्या कामाची गती पाहाता त्यांना एका चांगल्या कार्यालयाची गरज आहे आणि तशा प्रकारचं कार्यालय दादर परिसरातच शिंदे यांचं मुख्य कार्यालय उभारणार असल्याची माहित समोर येत आहे पण यासाठी ठराविक अशी जागा निश्चित झालेली नाही, असे सदा सरवणकर यांनी सांगितले.

आज एक आाभास निर्माण केला जातोय की मुंबईवर ठाकरेंचे राज्य आहे. मुंबईतल्या जनतेचं, शिवसैनिकांची शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराजी आहे. कारण ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कोणतेही काम मुंबईसाठी केले नाही. त्यांच्या कार्यकाळात एकाही बेरोजगाराला नोकरी मिळाली नाही. या पाश्वभूमीवर मुंबईकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यसाठी दादर येथे शिंदे गटाचे नवं कार्यालय उभारले जाईल अशी घोषणा सरवणकर यांनी केली.

हेही वाचा : 

Shivsena : विदर्भातील निर्भया प्रकरणावरून शिवसेना आक्रमक, महिला नेत्यांनी घेतली पिडीतेची भेट

Exit mobile version