Wednesday, September 25, 2024

Latest Posts

सदा सरवणकर यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

सध्या राज्यात दसऱ्या मेळवावरून राजकारण चांगलंच तापलेले दिसत आहेत. शिवाजी पार्कवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात रस्सीघेच सुरु आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यावरून सर्वत्र राजकारण चांगलंच तापलं आहे.

सध्या राज्यात दसऱ्या मेळवावरून राजकारण चांगलंच तापलेले दिसत आहेत. शिवाजी पार्कवरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात रस्सीघेच सुरु आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यावरून सर्वत्र राजकारण चांगलंच तापलं आहे. आज मुंबई हायकोर्टात या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला परवानगी देण्याबाबतची शिंदे गटाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. यामुळे शिंदे गटाला धक्का बसला आहे.

शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. परंतु न्यायालय आणखी शिवसेनेच्या याचिकेवर निर्णय देणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या परवानगी मिळणार का याचा निर्णय अपेक्षित आहे. शिवाजी पार्कवर शिवसेनेलाही मेळावा घेण्याची परवानगी मिळू नये याबाबत शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवसेना शिंदे गटाची हस्तक्षेप याचिका फेटाळली असून ही अंतरीम याचिका होती. सरवणकर यांना याचिका दाखल कऱण्याचा अधिकार नाही असे कोर्टाने म्हणले आहे. तर ठाकरे गटाचे म्हणणे न्यायालयाने मान्य केले आहे. त्यामुळे आता शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यास ठाकरे गटाला परवानगी मिळणार का हे पहावे लागणार आहे.

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) वर दसरा मेळावा कोण घेणार? यावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान शिवसेना, मुंबई महापालिका आणि शिंदे गटाकडून आपापली बाजू मांडण्यात आली आहे. दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava) राजकारण (Maharashtra Politics) चांगलंच तापलं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या मुद्यावर बोट ठेवत मुंबई महापालिकेने शिवसेना आणि शिंदे गटाला दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारल्यानंतर शिवसेनेने उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनीही मध्यस्थ याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु न्यायालयाने हि याचिका फेटाळली आहे.

हे ही वाचा:

Dasara Melava : हायकोर्टात जोरदार युक्तिवाद, दुपारनंतर पुन्हा सुनावणी

श्रीकांत शिंदेंचा फोटो होतोय व्हायरल, मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत मुलाकडे कारभार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss