spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सदगुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, अमोल मिटकरी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये १३ श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यामध्ये १३ श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतलं आहे. खासकरून कार्यक्रमाचे नियोजन आणि कार्यक्रमाची वेळ या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. या दुर्दैवी घटनेवरून राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनीही राज्य सरकारला चांगलाच फैलावर घेतलं आहे. शिंदे साहेब सद्गुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असे सांगताच या प्रकरणामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यसाठी एवढा खर्च करण्यात आला, पाण्यासारखा पैसा ओतला मग लोकांसाठी चांगली व्यवस्था का करता आली नाही?

देशाचे केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसाठी चांगली व्हीआयपी व्यवस्था होती. मात्र भक्त संप्रदायाचे सदस्य लाखोंच्या संख्येने येतील हे प्रशासनाला कळलं नाही का? मृतांच्या कुटूंबियांना देखील पाच लाख दिले जात आहेत. मुख्यमंत्र्यांचे विधान मी ऐकले आहे. या घटनेमुळे राजकारण करून नये असे सांगितले गेले होते. राजकारण करण्याचा प्रश्न येतच नाही. परंतु शिंदे साहेब जर अवधी माणसे मारत असतील तर सद्गुरू संप्रदाय तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असं अमोल मिटकरी म्हणाले.

या घटनेची गंभीर दखल घेतली गेली पाहिजे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. कारण राज्य सरकारच्या या घटनेला सर्वस्वी जबाबदार आहे. सरकार या कार्यक्रमाचे आयोजक आहे. याबाबतीत मी राज्यपालांना पत्र लिहिणार आहे असे अमोल मिटकरी म्हणाले. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये १२ पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी झाले आहेत. सोहळ्याच्या आयोजनाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, प्रधान सचिव यांच्यासह आप्पा धर्माधिकारी यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. त्यांच्या सदोष मनुष्यवधचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केली आहे.

हे ही वाचा : 

पुण्यामध्ये गारायुक्त पावसाला सुरूवात, पुणेकरांना सतर्क राहण्याचा इशारा

आमच्या विरोधामध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना लावली आहे, संजय राऊत

सत्यपाल मलिकांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर, पंतप्रधान मोदींनी उत्तर द्यावे, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss