spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लव्ह जिहादबाबत साध्वी प्रज्ञा यांचे वादग्रस्त विधान, ‘हिंदूंनी घरात सुऱ्या धारदार ठेवाव्यात’

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Sadhvi Pradnya Singh Thakur ) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कर्नाटकातील हिंदू (Hindu) कार्यकर्त्यांच्या हत्येबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “हिंदूंना त्यांच्यावर आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर हल्ला करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे.” हिंदू समाजाला किमान त्यांच्या घरात चाकू ठेवण्याचा सल्ला दिला आणि प्रत्येकाला स्वतःचे संरक्षण करण्याचा अधिकार असल्याचं प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सांगितलं. लव्ह जिहादबाबत (Love Jihaad) त्या म्हणाल्या की, त्यांना (मुस्लिमांना) जिहादची परंपरा आहे. बाकी काही नाही तर ते लव्ह जिहाद करतात. प्रेम असलं तरी त्यातही ते जिहाद करतात. आपण (हिंदू) सुद्धा प्रेम करतो, आपण देवावर प्रेम करतो, संन्यासी आपल्या परमेश्वरावर प्रेम करतो.

‘हिंदू जागरण वेदिका’च्या (Hindu Jagran Vedika) वार्षिक कार्यक्रमात प्रज्ञा ठाकूर पुढं म्हणाल्या, ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) ही त्यांची परंपरा आहे. एखाद्याचं प्रेम असलं तरी त्यातही जिहाद करतात. आम्ही (हिंदू) देखील प्रेम करतो. आम्ही देवावर प्रेम करतो, संन्यासी आपल्या परमेश्वरावर प्रेम करतात. देवानं निर्माण केलेल्या जगात सर्व अत्याचारी आणि पापींचा अंत करा, अन्यथा इथं प्रेमाची खरी व्याख्या टिकणार नाहीये. म्हणूनच, लव्ह जिहादमध्ये सामील असलेल्यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्या. तुमच्या मुलींचं रक्षण करा, त्यांना योग्य संस्कार शिकवा, असं आवाहनही त्यांनी केलं.

शिवमोग्गातील हर्षसह हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटनांकडं लक्ष वेधून प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी धारदार चाकू घरात ठेवावा. आपल्या घरात शस्त्रं ठेवावीत. हिंदूंनाही स्वसंरक्षणाचा अधिकार आहे. बाकी काही नाही तर किमान भाजी कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सुऱ्या तरी धारदार ठेवाच, असा सल्ला त्यांनी दिला. कोणती परिस्थिती कधी निर्माण होईल हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळं जर कोणी आमच्या घरात घुसून आमच्यावर हल्ला केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देणं हा आमचा हक्क आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

हे ही वाचा : 

Song Joong-Ki करतोय एका ब्रिटिश मुलीला डेट? Reborn Rich ऍक्टरचा गर्लफ्रेंडसोबतचा व्हिडिओ झाला व्हायरल

अब्दुल सत्तारांची तात्काळ मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, अजित पवार

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss