ठाकरे गटात दुःखाचं सावट, पंढरपूरचे तालुकाप्रमुख संजय घोडके यांचे हृदयविकाराने निधन

ठाकरे गटात दुःखाचं सावट, पंढरपूरचे तालुकाप्रमुख संजय घोडके यांचे हृदयविकाराने निधन

आज सकाळी दहाच्या सुमारास त्यांना पंढरपूरचे (Pandharpur) माजी नगराध्यक्ष संजय घोडके यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख संजय घोडके यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल. यांचं दुःखद निधन झालं आहे. त्यांच्या कुटूंबात एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वी त्यांची प्राणज्योत मावळली असल्याचे समजले. घोडके यांच्या असा अचानक अकाली निधनाने पंढरपूर शिवसेनेसह सर्वच क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. पंढरपूरमधील शिवसेनेच्या स्थापनेपासून संजय घोडके यांचा संघटनात्मक कामात सहभाग होते.

संजय घोडके त्यांचा शिवसेनेतील शाखा प्रमुखापासून प्रवास सुरु झाला होता . पंढरपूर शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख आदी पदावर त्यांनी निष्ठेने आणि धाडसाने त्यांनी काम केले होती. पंढरपूर तालुका हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या बालेकिल्ल्यात संजय घोडके यांनी आपल्या मुत्सद्दी राजकारणाच्या जोरावर पंढरपूर नगरपरिषदेत सेनेचे सहा नगरसेवक निवडून आणले होती . त्यावेळी ते स्वतः उपनगराध्यक्ष झाले. कालांतराने ते काहीकाळ नगराध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

पश्चिम महाराष्ट्र विभागीय परीट समाजाचे अध्यक्ष

शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीद वाक्यशी सुसंगत घोडके यांचे कार्य होते. राजकारण, समाजकारण, गोरगरीब, निराधार आदींमध्ये मामा म्हणून संजय घोडके हे परिचित होते. धर्मवीर आनंद दिघे कला व क्रीडा मंडळ, मीनाताई ठाकरे नवरात्र महोत्सव मंडळाची स्थापना घोडके यांनी केली होती. परीट समाजाचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते. यांच्या अशा जाण्याणे शिवसेनत दुःखद वातावरण आहे.

हे ही वाचा: 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

अनंत चतुर्दशीचे महत्व, जाणून घ्या सविस्तर माहिती

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version