समाजवादाचे मोठे स्तंभ असलेले मुलायम सिंह यादव यांचे निधन

समाजवादाचे मोठे स्तंभ असलेले मुलायम सिंह यादव यांचे निधन

समाजवादी पक्षाचे नेते व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह मुलायम सिंह यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीतील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. आज सकाळी ८. १५ वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते ‘नेताजी’ या नावाने प्रसिद्ध होते. मुलायम सिंह यादव यांच्या निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

शिंदे-ठाकरे गटांचे कोणते नवं चिन्हे व नाव?,आयोगाच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ते जीवनरक्षक औषधांवर होते. गुरुग्रामच्या मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मोठ्या टीमद्वारे त्यांच्यावर उपचार केले जात होते. मुलायमसिंह यादव यांना महिनाभराहून अधिक काळ रुग्णालयात दाखल करूनही त्यांची प्रकृती गेल्या आठवडाभरात झपाट्याने खालावली होती. प्रकृती खालावली असल्याने त्यांचा मुलगा आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव हे मेदांता रुग्णालयात उपस्थित होते.

हेही वाचा : 

उद्धव ठाकरेंनी शिवसेनेवर राष्ट्रवादीचे विचार लादले ; भाजपाचा ठाकरे गटला टोला

मुलायम सिंह यादव १९६७ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. १० वर्षांनंतर म्हणजेच १८७७ साली पहिल्यांदा मंत्री झाल्यापासून देशाचे संरक्षण मंत्री राहिलेले मुलायम सिंह यादव लोक दल, लोकदल (ब) आणि जनता दलाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. यूपी. १९९१ मध्ये मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी १९९२ मध्ये समाजवादी पक्षाची स्थापना केली आणि २०१६ पर्यंत ते अध्यक्ष होते. वर्ष २०१६ नंतर मुलायम सिंह यादव सपाचे संरक्षक बनले आणि अखिलेश यादव यांनी जबाबदारी स्वीकारली. त्यांचा धाकटा मुलगा प्रतीक यादव राजकारणात नसला तरी.

Abdul Sattar : शिंदे गटात राडा, मुख्यमंत्र्याच्या वर्षा बंगल्यावर सत्तारांची शिवीगाळ केल्याचा दावा

Exit mobile version