Thursday, September 26, 2024

Latest Posts

Hasan Mushrif यांनी पालकमंत्रीपदाच्या तुकड्यासाठी Sharad Pawar यांच्या विश्वासाचा सौदा केला: Samarjit Ghatge

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP) गटाचे आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) नेते समरजित घाटगे (Samarjit Ghatge) यांच्यात सध्या जोरदार वाद निर्माण झाल्याचे दिसतात आहे. समरजीत घाटगे यांच्या कागल मतदारसंघातील नागरिकांच्या पुण्यात झालेल्या मेळाव्यात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपस्थिती लावली होती. यावरून टीका करत हसन मुश्रीफ यांनी “हरामखोरी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या मेळाव्याला सुप्रिया सुळे यांनी जायला नको होते,” असे वक्तव्य केले होते. यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. समरजित घाटगे यांनी यावरून हसन मुश्रिफांवर पलटवार केला असून ‘हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी शरद पवारांच्या (Sharad Pawar) विश्वासाचा सौदा केला,’ अशी घणाघाती टीका केली आहे.

समरजित घाटगे यांनी कागल, गडहिंग्लज, उत्तूर या परिसरातील पुणे शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांशी संवाद साधण्यासाठी पिंपरी चिंचवड या ठिकाणी कौटुंबिक स्नेहमेळावा आयोजित केला होता. यावेळी बोलताना, “आदरणीय शरद पवार साहेब त्या व्यक्तीला आपल्या चिरंजीवांप्रमाणे वागवायचे. सुप्रिया सुळे त्यांना थोरल्या भावाप्रमाणे राखी बांधायच्या. त्यांनी या नात्याचा ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी सौदा केला,” अश्या खोचक शब्दांत त्यांनी हसन मुश्रिफांवर टीका केली.

काय म्हणाले समरजित घाटगे?

उपस्थितांशी संवाद साधत संमार्जित घाटगे म्हणाले, “काही दिवसांपूर्वी काहींनी चुकीचे शब्द वापरले. जे शब्द वापरले गेले त्याच्यावर लक्ष देणे आवश्यक नाही मात्र ते शब्द का वापरले गेले याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. शरद पवार कागल मध्ये पक्षप्रवेश आणि सभेला येतात. जयंत पाटील आले. सुप्रिया सुळे पुण्याच्या मेळाव्यात आल्या. ज्यांनी चुकीचे वक्तव्य केले, त्यांचे एकेकाळी हे कुटुंब होतं. शरद पवार त्या व्यक्तीला आपल्या चिरंजीवांप्रमाणे वागवायचे. सुप्रिया सुळेंनी थोरल्या भावाप्रमाणे राखी बांधायच्या. त्यांनी या नात्याचा ईडी आणि पालकमंत्री पदाच्या तुकड्यासाठी सौदा केला. या सौद्यामुळे त्यांना रात्री झोप येत नाही आणि त्यामुळे त्यांच्या सोबत असे चुकीचे शब्द येत आहेत,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “त्यांना आत्मचिंतन होऊ लागला आहे की आपण हे संबंध गमवून मोठी चूक केली आहे. त्यांची ही परिस्थिती पाहून मला त्यांची कीव येते. अशा व्यक्तीची अशी अवस्था होते. मात्र प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. कागलची जनता ही सीमा ओलांडलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवून देईल,” असे ते यावेळी म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

समरजीत घाडगे यांच्या पुणे येथे झालेल्या कागल मतदारसंघातील नागरिकांच्या मेळाव्यात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे याणी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली होती. “ईडी कागलमध्ये पोहोचल्यानंतर घरातील पुरुष मागे बसलेले होते. महिला समोर आल्या होत्या’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी “हरामखोरी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या मेळाव्याला सुप्रिया सुळे यांनी जायला नको होते,” असे वक्तव्य केले होते. यावरून हा वाद निर्माण झाला असून आता हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

CM Eknath Shinde मुंबई खड्डेमुक्त करणार होते, एवढ्या गंभीर परिस्थितीत ते कुठे होते? Aaditya Thackeray यांचा सवाल

एकाच मेट्रोचं उद्घाटन करायला नरेंद्र मोदी आज सहाव्यांदा येणार होते सुप्रिया सुळे यांनी करून दिली आठवण…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss