spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Hasan Mushrif यांना मी सिरीयसली घेत नाही, माझ्यामागे Sharad Pawar यांचा आशीर्वाद: Samarjit Ghatge

भाजप नेते समरजित सिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांनी काल (मंगळवार, ३ सप्टेंबर) ऐतिहासिक गैबी चौकातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात (NCP Sharad Pawar) पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी शरद पवार यांनी नाव न घेता हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर टीका करत लाचार म्हणून उल्लेख केला. तसेच, “संकटाच्या काळात बरोबर राहण्याऐवजी जे पळून गेले. त्यांचा आता हिशोब करायचा आहे,” असे वक्तव्य करत हसन मुश्रिफांवर निशाणा साधला. या वक्त्यव्यामुळे राजकीय वातावरणात चर्चाना उधाण आले असतानाच आता हसन मुश्रीफ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवार माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या का मागे लागलेत माहीत नाही,” असे वक्तव्य करत त्यांनी, “पवारसाहब से वैर नाही, समरजीत तुम्हारी खैर नही,” असे म्हणत समरजित घाटगे यांना टोला मारला आहे. यावर आता मुश्रीफांना समरजित घाटगे यांनीदेखील प्रत्युत्तर दिले असून, “माझ्यामागे शरद पवारांचा आशीर्वाद असल्यामुळे मला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. मी हसन मुश्रीफ यांना सिरीयसली घेत नाही,” असे वक्तव्य केले आहे.

काय म्हणाले समरजित घाटगे?

हसन मुश्रीफांना प्रत्युत्तर देत समरजित घाटगे म्हणाले, “काही दिवसांपूर्वी बोलले होते की घाटगे यांना महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. आता त्यांची काही वेगळीच वक्तव्ये येत आहेत. मला त्याची काळजी करण्याची गरज नाही. कागल, गडहिंग्लज, उत्तुरची स्वाभिमानी जनता माझी पाठराखण करणारच आहे. माझ्यामागे शरद पवारांचा आशीर्वाद असल्यामुळे मला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी दिलेल्या आहेत. मी त्यांच्या गोष्टींना फारसे सिरीयसली घेत नाही,” असे ते म्हणाले.

हसन मुश्रीफ यांनी शरद पवारांवर टीका करत, “शरद पवार माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या का मागे लागलेत माहीत नाही” असे वक्तव्य केले होते. त्यावर प्रतिक्रया देत घाटगे म्हणाले, “मला काही बोलतात ते बोलू देत,पण मला या वक्तव्याचा राग, संताप आहे आणि खंत वाटते. पवार साहेबांचे अनेक वर्षाचे राजकारणी आहेत. पण विरोधी पक्षानेही त्यांच्यावर असे बोलायचे धाडस केले नाही. मात्र ते काम पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. मुश्रीफ यांनी आता शरद पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा मी पुर्ण निषेध करतो. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व पदे दिली, तेव्हा त्यांना अल्पसंख्यांकाचा विषय नव्हता का ? वडिलांच्या वयाच्या पवारांवर आरोप करायचे धाडस तुम्ही केलं, तुम्ही हे घोर पाप केले आहे. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही. समरजीत घाटगे यांना काय बोलायचे ते बोला, पण मुश्रीफ यांनी जाहीर माफी मागावी,” असे ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते हसन मुश्रीफ?

शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रितिक्रिया देताना हसन मुश्रीफ म्हणाले, “शरद पवार माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या का मागे लागलेत माहीत नाही. शरद पवार यांनी नेहमीच जनतेचा विचार केलेला आहे. निवडणूकीचा निकाल ठरवेल. निवडणूकीच्या आधी काही बोलणं योग्य नाही. कोणत्या ही माणसाला आम्ही कमी लेखत नाही. माझ्या सहा निवडणुकांमध्ये आले तेव्हा नेहमी म्हणायचे कि, राजाविरोधात प्रजा जिंकली पाहिजे. तेच मी पुन्हा म्हणत आहे कि, पवारसाहब से वैर नही, समरजीत तुम्हारी खैर नही.”

ते पुढे म्हणाले, “पवार साहेब माझे दैवत आहेत. आमचे पंन्नास आमदार गेले आहे पण शरद पवार माझ्या मागे का लागलेत ते मला समजलेलं नाही. शरद पवार माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या का मागे लागलेत माहीत नाही. ही निवडणूक नायक विरुध्द खलनायक आहे. किती बदल होईल ते निवडणूक ठरवेल,” असे ते यावेळी म्हणाले.

काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार यांनी काल गैबी चौकातून उपस्थितांना संबोधित केले. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता टीका कारली आणि त्यांचा उल्लेख लाचार असा केला होता. त्याचवेळी ते म्हणाले, “आम्ही कागल तालुक्यातील काही लोकांना साथ दिली, त्यांना मोठं केलं, आमदार म्हणून निवडून आणालं. त्यांना मंत्रीपद दिलं. मात्र, संकटाच्या काळात बरोबर राहण्याऐवजी ते पळून गेले. त्यांचा आता हिशोब करायचा आहे,” असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा:

कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य

Sharad Pawar माझ्या सारख्या अल्पसंख्याकाच्या मागे का लागलेत?: Hasan Mushrif

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss