संभाजी भिडेंना अटक व्हायलाच हवी, छगन भुजबळांची मागणी

२७ जून रोजी झालेल्या पुण्यामध्ये धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पुणे हादरले आहे. या प्रकरणावर संभाजी भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

संभाजी भिडेंना अटक व्हायलाच हवी, छगन भुजबळांची मागणी

२७ जून रोजी झालेल्या पुण्यामध्ये धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण पुणे हादरले आहे. या प्रकरणावर संभाजी भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत केलेल्या विधानावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या विरोधामध्ये आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे संभाजी भिडे यांच्या विरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी संभाजी भिडेंना अटक व्हायलाच हवी अशी भूमिका मांडली आहे.

१५ ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली होती. आणि याच दिवशी दुखवटा पाळावा असे संभाजी भिडे गुरुजी म्हणाले होते यावर छगन भुजबळ म्हणाले की, पुण्यात हे काय चाललेय काय? महात्मा फुले यांनी सगळ्यांच्या शिक्षणासाठी काम केले. अशा या पुण्यभूमीत काय चालू आहे? पोलीस आयुक्त काय करतात? यावर कडक कारवाई करा. न्यायव्यवस्थेने जरा सुद्धा दया दाखवता कामा नये, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. एव्हाना देशद्रोही म्हणून अटक झाली असती. संभाजी हे नाव वापरून ते बहुजनांच्या पोरांना भडकवत आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केला आहे.

संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये वातावरण तापले आहे. मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही, असे वक्तव्य करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून देशाचे स्वातंत्र्य व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर तात्काळ राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा. अन्यथा तो कसा दाखल करायचा ते काँग्रेस बघून घेईल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

‘काळे झेंडे दाखवण्याचा धंदा आमचा, ते आमच्याकडून शिका’ असे विधान करत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना खडेबोल सुनावले

Air India – एअर इंडियाच्या विमानात आणखीन एक घाणेरडा प्रकार, प्रवाशाने सर्वांसमोर केलं…

पुण्यामध्ये हल्ला झालेल्या घटनेवरून अजित पवार संतापले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version