spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संभाजी भिडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; अनेक मुद्यांवर चर्चा

आज संभाजी भिडेंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वेगवेगळी वक्तव्य आणि भूमिकांवरून नेहमीच वादात राहणारे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) ऊर्फ भिडे गुरुजी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीला पोहोचले. मंत्रालयात संभाजी भिडे शिंदे यांच्या भेटीला गेले. मुख्यमंत्री झाल्यापासून मी त्यांची भेट घेतली नव्हती. त्यामुळे ही सदिच्छा भेट देण्यासाठी आलो आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी माध्यमांना दिली. संभाजी भिडे मंत्रालयात आले त्यावेळी त्यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) हेदेखील उपस्थित होते.

महारष्ट्राचे अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर चाले आहेत त्यावर विरोधक शिंदे आणि फडणवीस सरकारवर चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. त्याच काळात संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.संभाजी भिडे हे एक हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत. राज्यात शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत असतात. ते मूळचे सांगलीतील रहिवासी आहेत. आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत असलेल्या भिडे गुरुजींनी काही काळानंतर कट्टर हिंदुत्वावर आधारीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटना स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या तत्त्वांनुसार या संघटनेचं काम चालतं.

या भेटीबाबात बोलताना ते म्हणाले, “मी राष्ट्रहिताच्या काही मुद्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र, मंत्रीमंडळाची बैठक असल्याने सविस्तर चर्चा झाली नाही. त्यामुळे आगामी काळात त्यांची पुन्हा भेट घेणार आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे यांनी दिली. दरम्यान, या भेटीचे काही राजकीय अर्थ काढले जात असल्याबाबात विचारले असता त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भेटीपूर्वीही त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे सरकारचे कौतुक केले. “ते मुख्यमंत्री झाल्यापासून मला त्यांना भेटायचं होतं. मात्र, काही कारणास्तव ते शक्य झालं नाही. त्यामुळे आज वेळ काढून मी त्यांना भेटायला आलो”, असे ते म्हणाले. तसेच सरकारच्या कामागिरीबाबत विचारले असता त्यांनी हे सरकार सरकार उत्तमरित्या काम करत असून महाराष्ट्रातील मंत्रीमंडळ कौतुकास्पद आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हे ही वाचा :

Raj Thackeray: मुख्यमंत्री शिंदे-राज ठाकरे अन् ‘वीर दौडले सात’!

तुम्ही हिंदू म्हणून आवाज उठवा, एकत्र या, तुम्हाला पुढे कसं सुखरुप घरी पाठवायचं हे… ; नितीश राणे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss