संजय शिरसाट यांच्या निशाण्यावर संभाजी भिडे

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

संजय शिरसाट यांच्या निशाण्यावर संभाजी भिडे

संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकारणी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडे म्हणाले होते की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे वडील मुस्लीम होते असे वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केल्याने राज्यातच नाही तर देशभरात संतापाचे वातावरण आहे. तर, यावरुन अनेक राजकीय प्रतिकिया देखील येत असून, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील यावरुन भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज संजय शिरसाट हे औरंगाबाद येथे आहेत तेव्हा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे.

पत्रकार परिषदेमध्ये संजय शिरसाट म्हणाले की, “संभाजी भिडे कोणाचे पिल्लू आहे, काय आहे याबद्दल मी बोलणार नाही. पण, माझे देखील वैयक्तिक मत आहे की, भिडे गुरुजी यांनी असे वादग्रस्त वक्तव्य करु नयेत. प्रत्येकवेळी जायचे आणि काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायचे. माझ्या शेतातील आंबे खाल्ल्याने मुलं होतात असे म्हणणे कोणतं लॉजिक आहे. तुमचा कोणीतरी सन्मान करत असेल किंवा तुम्हाला मानत असेल तर तुम्ही काहीही जे तोंडात येईल ते बकणे योग्य नाही. त्यामुळे मी देखील त्यांचे निषेध करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील सांगणार आहे की, अशाप्रकारे नेहमी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लोकांवर एकदा तरी कारवाई झाली पाहिजेच. जेणेकरुन हे लोक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाहीत, असे संजय शिरसाट म्हणाले.

पुढे संजय शिरसाट म्हणाले की, भिडे यांच्याबद्दल अनेक मतप्रवाह आहेत. त्यांचे मूळ नाव काय, संभाजी भिडे वैगरे कसे झालेत या वादात मला पडायचे नाही. मात्र, त्यांचे वक्तव्य समाजातील सर्व लोकांसाठी हानिकारक आहेत. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अशी माझी विनंती राहिल. तर, भिडे यांच्यावर निश्चितच कारवाई केली जाईल. असे चालणार नाही. कारण, माझ्यासारख्या व्यक्तीने असे वक्तव्य केले म्हणून मी सत्तेत असल्याने कारवाई होणार नाही का? असा प्रश्न संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे. संभाजी भिडे यांच्या अनेक वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यामध्ये त्याचबरोबर देशामध्ये खळबळ उडाली आहे आणि संभाजी भिडे यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी अनेक राजकीय कार्यकर्त्यांची मागणी आहे.

हे ही वाचा:

ODI मालिकेला आजपासून सुरुवात, पहिला सामना भारतासाठी लकी की अनलकी

उद्धव ठाकरेंनी केले उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक

नागपूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version