“RSS कडून सुपारी घेत राज ठाकरे हिंदू आणि मुस्लीम दंगली घडवण्याचं काम करतायेत”

“RSS कडून सुपारी घेत राज ठाकरे हिंदू आणि मुस्लीम दंगली घडवण्याचं काम करतायेत”

राज ठाकरे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुपारी घेऊन काम करतात, राज ठाकरेंनी चित्रपटाला समर्थन दिलं खोटा इतिहास पसरवण्याची सुपारी घेतली आहे का? खोटा इतिहास दाखवणाऱ्या लोकांच्या पाठीशी राज ठाकरे का उभे राहतात?, हिंदू आणि मुस्लीम दंगली घडवण्याचं काम करत आहेत? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे (Sambhaji Brigade) मनोज आखरे यांनी केलाय.

हेही वाचा : 

Supriya Sule: जनरल डायरने जसा अन्याय केला तसा अन्याय हे सरकार करतयं; सुप्रिया सुळेंची जहरी टीका

राज ठाकरेंनी RSS ची सुपारी घेऊन हर हर महादेव चित्रपट बाहेर आणला आणि महाराष्ट्र अशांत करण्याचं काम केलं. जो इतिहास घडला नाही तो इतिहास दाखवायचा सध्या काही लोक प्रयत्न करत आहेत. विश्वासू सरदारांची बदनामी करण्याचं काम केलं. खोटा इतिहास दाखवला जातो तेव्हा फक्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे समर्थन करतात. हे कोणत्या मानसिकतेतून हे करतात, असंही आखरे म्हणालेत.

भांडारकरवर हल्ला झाला. तेव्हा राज ठाकरे बहुलकरच्या पाया पडतात. ज्या बहुलकरनं जेम्स लैनला मदत केली. इतिहासाचे चित्रपट मालमसाला लावून दाखवला जाऊ नये.आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे. छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी ब्रिगेडची बैठक आयोजित केली आहे, असंही आखरे म्हणाले आहेत.

मुंबई इंडियन फॅन्स साठी खुश खबर; घातक गोलंदाज आयपीएलमध्ये करणार कहर

चित्रपटात व्यभिचारी दाखवले

संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे की, छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवण्याचा मूर्खपणा केला आहे. कवड्याची माळ घातली आहे तीपण हास्यास्पद. बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे. कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे कान्होजी जेधे शिपाई आहेत असे दाखवलं. बांदलं देशमुख खुळी दाखवली, व्यभिचारी दाखवले आहेत. वारंवार मराठी मराठी ह्या शब्दाचा उपयोग केला आहे. पाटील म्हणजे बलात्कारी घाणेरडा दाखवला आहे. राष्ट्रमाता बाजीप्रभूचा सल्ला घेताना दाखवले आहे, असा आरोप देखील संभाजी ब्रिगेडनं केला आहे.

Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉसच्या घरातील प्रॉपर्टीचे नुकसान केल्या मुळे अमृता धोंगडेला सुनावली ही शिक्षा

Exit mobile version