जितेंद्र आव्हाडांच्या वक्त्यव्यांवर संभाजी छत्रपती संतापले, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य…

जितेंद्र आव्हाडांच्या वक्त्यव्यांवर संभाजी छत्रपती संतापले, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य…

अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह्य विधान केलं होत. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यामुळे राज्यात भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात प्रदर्शने करण्यात आले होते. त्याच बरोबर अनेक नेत्यांनी देखील जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता जितेंद्र आव्हाड यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि माजी खाजदार संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत खात्यावरून ट्विट करत चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नसल्याचे आव्हाड यांना सांगितले आहे.

संपूर्ण महाराष्ट्रातून जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला जातो आहे. राज्यभरातील हिंदू संघटनांनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि जितेंद्र आव्हाड यांचा विरोध केला गेला होता. तर भाजपच्या काही नेत्यांनी तर यामागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार यांचा हात आहे असे सांगत टीका केली आहे. तर आता या मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि मजी खाजदार संभाजी राजे छत्रपती यांनी ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. छत्रपती संभाजी राजे छत्रपती यांनी ट्विट केल आहे की “जितेंद्र आव्हाड एका विशिष्ट कंपूत वाढलेले आहेत. महाराष्ट्र त्यांना गांभीर्याने घेत नाही आणि घेणारही नाही. मतांसाठी, चर्चेत राहण्यासाठी बेताल वक्तव्य करणे बरे नव्हे. याचे परिणाम भोगावे लागतील.” अस ट्विट संभाजी राजे छत्रपती यांनी कल आहे.

राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं होते की “हे सगळे समजायला अक्कल लागते… औरंगजेब अफजल खान हे इतिहासातून काढून टाकले तर मग शिवाजी महाराजांची लढाई कुणाबरोबर झाली. त्यांचे शौर्य चलाखी युद्ध नीति कशी समजावणार… जाऊदे तुमचा दोष नाही. हे सगळे समजणे म्हणजे मुंबईचा गँगवॉर नाही… झाकली मूठ सव्वालाखाची.”, असे विधान जितेंद्र आव्हाड यांनी केल होत.

हे ही वाचा : 

अदाणी समूहाबाबत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कला मोठा खुलासा, LIC आणि SBI ने …

बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यावर नाना पटोलेंनी दिली प्रतिक्रिया, आमच्याकडे राजीनामा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version