राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संभाजीराजे पुन्हा आक्रमक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात संभाजीराजे पुन्हा आक्रमक

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अवमान केल्यामुळे त्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. या मुद्द्यावर भाजपकडून सारवासारव केली जात आहे. आठ दिवस उलटले तरी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर राज्य सरकारकडून कोणतीही कारवाई केली गेली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी तर महाराष्ट्र बंद किंवा विराट मोर्चा काढण्याचे संकेत दिले आहे. तर माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त करत सरकारलाच इशारा दिला आहे.

औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) मराठवाडा विद्यापीठात दिक्षांत समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं म्हटलं होतं. तसेच शिवाजी महाराजांबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना केली होती. त्यामुळे राज्यपालांच्या या विधानाचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीच दखल घ्यावी अशी मागणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन राज्यपालांना हटवण्याची मागणी केली होती. राज्यपालांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावं, त्यांच्या पक्षातील नेतेच अशी वक्तव्य करत आहेत. त्यामुळे त्यांनी याची उत्तरे द्यावं, अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी आधीही केली होती.

हे ही वाचा : 

Dhrishyam 2 : अजय देवगणचा दृश्यम २ ची नवव्या दिवशी १५० कोटींची कमाई

Haryana Panchayat Election Result ‘या’ माजी मंत्र्याच्या पत्नीचा जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाला

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version