spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

प्रसाद लाड यांच्या वक्तव्यावर संभाजीराजे संतापले

काही दिवसांपासून भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) नेते एका मागून एक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या बदल वादग्रस्त वक्तव्य (Controversial statement) करत आहेत. भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात ( Konkan) झाला, असे विधान केले आहे. प्रसाद लाड (Prasad Lad) यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी तसेच विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. आता माफी मागून चालणार नाही. तर भाजपाने आता रगडून प्रायश्चित्त केले पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. तर दुसरीकडे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी देखील लाड यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

लाड यांनी केलेले विधान बेजबाबदारपणाचे आहे. त्यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या प्रकरणात लक्ष घालावे. लाड यांच्या पक्षप्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. ते जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्रातून काढून टाकले पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. “प्रसाद लाड यांचे विधान मी नुकतेच ऐकले. शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असे ते म्हणत आहेत. हे दुर्दैव आहे. त्यांचा अभ्यास अपूर्ण आहे. प्रसाद लाड हे जबाबदार व्यक्तिमत्त्व आहेत. ते आमदार आहेत. मात्र शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचे ते म्हणत आहेत. ही शरमेची बाब आहे. मी त्यावर काय बोलणार. त्यांनीच याबाबत उत्तर द्यावे. लाड यांच्या पक्षाच्या प्रमुखांनी त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यांना हे जमत नसेल तर त्यांना महाराष्ट्राच्या बाहेर काढून टाका,” अशी भूमिका संभाजीराजे छत्रपती यांनी घेतली.

“प्रसाद लाड यांनी बेजबाबदार विधान केलेच कसे. लहान मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेतच शिकवणे गरजेचे आहे. प्रसाद लाड यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे. इकडे शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहे. ते आमची अस्मिता आहेत, असे लाड म्हणतात. तर दुसरीकडे शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असा दावा केला आहे.

हे ही वाचा : 

Bigg Boss 16 : शिव ठाकरेंमुळे संपूर्ण घरातील सदस्यांच्या डोळ्यात आले अश्रू

देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्र्यांसोबत केली समृद्धी महामार्गाची पाहणी

भाजपनं इतिहास संशोधन मंडळाची नव्याने स्थापन केलीय का?, प्रसाद लाडांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांनी केला सवाल

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss