अशोक खरातांकडून संदीप देशपांडेवर जोरदार हल्ला..

संदीप देशपांडे हे मनसे नेते असून यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी आणि कामगार सेनेच्या अशोक खरातांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांवर हल्ला केल्याचा उल्लेख चार्जशीटवर करण्यात आला आहे.

अशोक खरातांकडून संदीप देशपांडेवर जोरदार हल्ला..

संदीप देशपांडे हे मनसे नेते असून यांच्यावर हल्ला झाल्याची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी आणि कामगार सेनेच्या अशोक खरातांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांवर हल्ला केल्याचा उल्लेख चार्जशीटवर करण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळविण्यासाठी संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याची बाब उघड झाली आहे. हा हल्ला केल्याने उद्धव ठाकरेंची सहानुभूती मिळविण्यासाठी मदत होईल असा विश्वास आरोपी अशोक खरात याला वाटत होता ही माहिती आरोपी अशोक खरात यांच्या जबाबात स्पष्ट झाली आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून अशोक खरात आणि त्यांच्यासोबत इतर आरोपींवर गुन्हा दाखल केला गेला आहे. महाराष्ट्र राज्य माथाडी आणी कामगार सेनेच्या अशोक खरात यांच्याकडून संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला केल्याचा उल्लेख चार्टशीटवर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे परत सत्तेत आल्यावर बक्षीस देतील यासाठी हल्ला केल्याचा उल्लेख नोंदवला आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून अशोक खरातवर व इतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेकडून निलेश पराडकर याला फरारी आरोपी दाखवले आहे. मात्र पोलिसांकडून या हल्ल्यात कोणताही राजकीय अँगल नाही असे सांगण्यात आले आहे. तसेच मुंबई गुन्हे शाखेकडून निलेश पराडकरचा शोध सुरु आहे.

संदीप देशपांडे हे मनसेचे सरचिटणीस आहेत. संदेश देशपांडे हे शिवाजी पार्कवर मॉर्निंग वोक (Morning Walk) करत असताना चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला होता. संदीप देशपांडे यांच्यावर ३ मार्च रोजी हा हल्ला करण्यात आला. क्रिकेटमध्ये वापरले जाणारे स्टम्प्सच्या साहाय्याने संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तींनी हल्ला करताना स्वतःचा चेहरा झाकला होता. संदीप देशपांडे हे मॉर्निंग वोक ला जातात याची माहिती ही आरोपीना होती. शिवाजी पार्कवर संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला करून आरोपीनी ताबडतोब पळ काढला. या हल्ल्यात संदीप देशपांडे याना थोड्या प्रमाणात मार लागला आहे. या हल्ल्याचे समजताच मनसैनिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मनसेचे सरचिटणीस यांची चौकशी केली होती. संदीप देशपांडे यांच्यावर करण्यात आलेला हल्ला हा गंभीर असून याची दखल मुख्यमंत्र्यानी घेतली. त्याचबरोबर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला कठोर शासन होईल असे देखील मुख्यमंत्र्यांनी संदीप देशपांडे यांना आश्वासन दिले. गुन्हे शाखेकडून या हल्य्याबद्दल जोरदार चौकशी सुरु आहे.

हे ही वाचा:

गद्दार दिन यावर शिंदे गटाच्या बड्या नेत्यांनी दिली प्रतिक्रिया, हळू हळू बंडाचे खरे स्वरुप…

शिवसेनाही अभेद्य राहावी ही मनापासून इच्छा, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version