संदीप देशपांडेंनी केला मोठा दावा, कोरोना काळात पालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे देणार २३ जानेवारीला

आता कोणत्याही क्षणी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा ही होऊ शकते. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत.

संदीप देशपांडेंनी केला मोठा दावा, कोरोना काळात पालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे देणार २३ जानेवारीला

आता कोणत्याही क्षणी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा ही होऊ शकते. ही निवडणूक जिंकण्यासाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. भाजपाने तर मुंबई पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी सभा, बैठका यांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षातील नेते एकमेकांवर चिखलफेक उडवताना दिसत आहेत. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (Maharashtra Navnirman Sena leader Sandeep Deshpande) यांनी ठाकरे गटावर एक गंभीर आरोप केला आहे. आणि त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. २३ जानेवारी रोजी करोना काळातील सर्वात मोठा घोटाळा समोर आणणार आहे, असे संदीप देशपांडे म्हणाले आहेत.

त्याचसोबत संदीप देशपांडे यांनी या संदर्भात ट्विट करत देखील माहिती दिली आहे. या ट्विट मध्ये त्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद म्हणजे वीरप्पन गॅंगच्या उलट्या बोंबा असल्याचा टोला संदिप देशपांडेंनी लागवालाय. वीरप्पन गॅंगचा कोरोना काळातला मोठा घोटाळा पुराव्यासहीत सोमवारी दिनांक २३ जानेवारीला उघड करणार असल्याचे देशपांडेंनी म्हटलं आहे. त्यामुळे आता सोमवारी दि २३ जानेवारी रोजी संदीप देशपांडे नेमकी काय भूमिका मांडणार किंवा काय पुरावे सादर करणार ते पाहणं नक्कीच महत्वाचं असेल.

हे ही वाचा:

मुंबईत मोदींच्या दौऱ्यादरम्यान एन एस जीचा आयडी कार्ड घालून घुसखोरीचा प्रयत्न, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Mumbai Mega Block, मुंबईकरांनो उद्या लोकलने प्रवास करायचा असेल तर आजच करा नियोजन

जैन मंदिराच्या कार्यक्रमासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दाखल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version