युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप

युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर संदीप देशपांडेंचा गंभीर आरोप

सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण चांगलाच तापलं आहे. कोरोना काळात मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या कामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप अनेक वेळा झाला आहे. पण पहिल्यांदाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) पुराव्यांसहित हा कथित भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितलं जात आहे. करोना काळात काही विशिष्ट लोकांना वेगवेगळ्या प्रकारची कंत्राटे देण्यात आली. मालाड (Malad) येथे उभारलेल्या करोना सेंटरची कंत्राटे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला. करोना सेंटरला पुरवठा होत असलेल्या वस्तूंची पुरवठ्यापेक्षा अधिकची बिलं काढण्यात आली. प्रभाग अधिकारी यांच्या संगनमताने हा भ्रष्टाचार झाला असून याची पुराव्यासह तक्रार ईडी, ईओडब्लू यांच्याकडे करणार असल्याचे सांगत संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी पत्रकार परिषदेत युवा सेनेचे पदाधिकारी आणि संबंधित प्रभाग अधिकाऱ्याचे नाव उघड केले.

संदीप देशपांडे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच वीरप्पन गँगचा घोटाळा मी उघड करणार असे ट्विट केले होते. त्यानंतर त्याखाली युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मला शिवीगाळ केली. त्यावरुन युवा सेनेवरचा माझा संशय पक्का झाला. आम्ही तपास केल्यानंतर अनेक धक्कादायक माहीती आमच्यासमोर आली असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी वैभव थोरात या युवासेनेच्या पदाधिकाऱ्याचे नाव घेतले. करोना सेंटरमध्ये जेवण पुरविणे, लाँड्री, सॅनिटायझर पुरविणे यासारखी कंत्राटे थोरातच्या कंपन्यांना देण्यात आली.

कोरोनाच्या काळात मुंबई महानगरपालिकेत झालेल्या घोटाळ्याचे पुरावे असल्याचा पेन ड्राईव्ह हाती लागल्याचे संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं. या पेन ड्राईव्हमध्ये बँक खात्यांचे पुरावे देखील असल्याचं त्यांनी सांगितलं. कशा पद्धतीने मुंबईची लूट करण्यात आली हे आपण सोमवारी उघड करणार आहे. तसंच या प्रकरणाची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात Anti Corruption Bureau (ACB) कडे करणार असल्याचं संदीप देशपांडे यांनी सांगितलं होतं.

हे ही वाचा:

१८ हजार फूट उंचीवर आणि -४० डिग्री तापमानात उपोषण, सोनम वांगचुकला का करावी लागली पंतप्रधान मोदींकडे याचना?

Tu Jhoothi Main Makkaar चित्रपट येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस, ट्रेलरमध्ये रणबीर आणि श्रद्धांची रोमँटिक केमिस्ट्री

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version