कुठे आणून ठेवलीये ठाकरेंची शिवसेना; संदीप देशपांडेंचा खोचक सवाल

मनसेच्या संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर ट्विट केले आहे.

कुठे आणून ठेवलीये ठाकरेंची शिवसेना; संदीप देशपांडेंचा खोचक सवाल

महाराष्ट्र सरकार समोर सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे. राज्यात संघर्षाला रोज एक वेगळे वळण मिळत आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या काही दिवसात राज्यातील राजकारणाचे समीकरणच बदलून टाकले. सत्ता संघर्षाची ही लढाई आता न्यायालयात पोहोचली आहे. उद्या एकनाथ शिंदे आमदारांसह मुंबईत पार्ट येणार आहेत. तेव्हा उद्या राज्यात काय घडामोडी घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याबाबत अनेकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. नुकतीच मनसेच्या संदीप देशपांडे यांनी शिवसेनेच्या सध्याच्या परिस्थितीवर ट्विट केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संदीप देशपांडे यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. देशपांडे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलं, ”राजीनाम्याची स्क्रीप्ट ठरली आहे. संभाजी नगरच्या नामांतराचा आव आणायचा आणि आपले हिरवे प्रेम हेच खरे हिंदुत्व हे सिद्ध करायचे. कुठे आणून ठेवलीये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना”?, असा सवाल त्यांनी या ट्विट मधून विचारला आहे.

http://https://twitter.com/SandeepDadarMNS/status/1542081295576346624?t=_wqzSI2KGbbCdaZLjHBU7g&s=19

या सगळ्या दरम्यान राज ठाकरे यांनी आपला पाठिंबा भाजपला दिला आहे. त्यामुळे उद्याच्या बहूमत चाचणी मनसे भाजपाच्या बाजूने मतदान करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे उद्या भाजपाच्या बाजूने मतदान करणार आहेत. तर मनसेचे संदीप देशपांडे यांच्या या खोचक प्रश्नाला शिवसेनेकडून काय उत्तर मिळते हे पहावे लागेल.

Exit mobile version