संदीप क्षीरसागर यांनी सांगितली शरद पवारांसंदर्भात त्यांची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांची पहिली स्वाभिमान सभा ही आज बीडमध्ये होणार आहे. या सभेची जबाबदारी बीडचे आमदार आणि नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेल्या संदीप क्षीरसागर यांच्यावर आहे.

संदीप क्षीरसागर यांनी सांगितली शरद पवारांसंदर्भात त्यांची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांची पहिली स्वाभिमान सभा ही आज बीडमध्ये होणार आहे. या सभेची जबाबदारी बीडचे आमदार आणि नव्यानेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झालेल्या संदीप क्षीरसागर यांच्यावर आहे. या स्वाभिमान सभेच्या तयारीसाठी आठवडाभर झालं संदीप क्षीरसागर यांनी बीड जिल्हाभर फिरुन या सभेची पूर्वतयारी केली आहे. पहिली स्वाभिमान सभा बीडमध्ये कशामुळं केवळ धनंजय मुंडे यांचा जिल्हा आहे म्हणून का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी संदीप क्षीरसागर यांना केला होता. त्यावेळी बीड जिल्हा हा शरद पवारांचा जिल्हा असल्याचे सांगितले. जनता पवारसाहेबांसोबत खंबीरपणे उभा असल्याचे क्षीरसागर म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज बीडमध्ये सभा घेत आहेत. पवार आज आपली भूमिका स्पष्ट आहे. शेवटपर्यंत शरद पवार साहेबांच्या पायाशी राहीन, अशी भावना राष्ट्रवादीचे नेते संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली. ते बीडमधील सभेत बोलत होते. त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मला लोकांनी प्रश्न विचारला ‘सत्ता की साहेब’, प्रश्न संपायच्या आधी मी उत्तर दिलं. मी विचार सु्द्धा केला नाही. मी शरद पवारांसोबत राहीन. त्यांच्या पाया पाशीच राहीन, असं संदीप क्षीरसागर म्हणाले आहेत. शरद पवार यांच्या सभेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बीडमध्ये जमा झाले आहे. यावेळी नेत्यांनी आवेषपूर्ण भाषणं केली. सत्तेमधून आम्ही ठराविक आमदार बाहेर पडलो होतो. काही आमदार आम्हाला म्हणाले आम्ही सत्तेमध्ये आहोत, आमच्यासोबत पंतप्रधान मोदी आहेत, तुमच्याकडे काय आहे. मी म्हणालो माझ्याकडे पवार साहेब आहेत.

बीड आणि मराठवाड्याची जनता स्वाभिमानी आहे. कोणी इकडे तिकडे गेलं तरी आयुष्यभर तुमच्यासोबत तुमच्या विचारासोबत जोडून राहणार, अशी भूमिका संदीप क्षीरसागर यांनी मांडली.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अजित पवार सत्ताधारी पक्षासोबत गेलेत. शरद पवार यांनीही सत्तेत सामील व्हावे यासाठी अजित पवार गट प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जात आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्यात दोन दिवसांपूर्वी भेट झाली होती. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय. त्यामुळे शरद पवार याबाबत काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

हे ही वाचा: 

भरत गोगावलेनी केला गौप्यस्फोट , राजकीय नेत्यांकडून नवीन चर्चांना उधाण

नवाब मलिक यांनी सांगितलेच…. मी यांच्यासोबतच …

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version