Balasaheb Thackeray यांनी दिलेली शपथ Sheetal Mhatre विसरल्या आहेत, Uddhav Thackeray यांच्यावरील टिकेवरून Shivsena UBT प्रवक्ते आक्रमक

Balasaheb Thackeray यांनी दिलेली शपथ Sheetal Mhatre विसरल्या आहेत, Uddhav Thackeray यांच्यावरील टिकेवरून Shivsena UBT प्रवक्ते आक्रमक

शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज (शनिवार, २७ जुलै) ६५ वा वाढदिवस असून मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (Uddhav Thackeray Birthday) शिवसैनिकांनी जागोजागी मोठमोठे बॅनर्स लावून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांच्या विरोधकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. परंतु शिवसेना शिंदे गटाच्या (Shivsena) प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा उल्लेख ‘शिवसैनिकांसाठी काळा दिवस’ असा केला आहे. यावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून शिवसेना उबाठा गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी (Sanjana Ghadi) यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) दिलेली शपथ शितल म्हात्रे विसरल्या आहेत,’ असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

संजना घाडी यावेळी म्हणाल्या, “दांडा आणि ***ची भाषा करणारी हीच ती बाई का? हा प्रश्न आता आमच्यासमोर येत आहे. २००५ मध्ये काय झालं ? शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना जी शपथ दिली तेव्हा याच शितल म्हात्रे होत्या त्यांना त्या शब्दाचा विसर पडला असावा. बाळासाहेब ठाकरे म्हणालेले माझ्या नंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळा, ही जबाबदारी त्या विसरल्या आहेत. राजकीय संस्कृतीचा ऱ्हास करणाऱ्या आणि अत्यंत लायकी नसलेल्या पातळीवर जाऊन बोलणाऱ्या या दोन बायका आहेत त्यांच्यावर बोलणं आम्हाला योग्य वाटत नाही. आज त्याच उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे ज्यांनी तुम्हाला नगरसेवक केलं, वेगवेगळ्या समित्या दिल्या त्यांच्या मागून मागून तुम्ही राहत होता आणि आज तुम्ही या पद्धतीने बोलत आहात. राजकीय संस्कृतीचा ऱ्हास यासाठी म्हणते की, कितीही शत्रुत्व असलं तरी वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या जातात. तिला उत्तर फक्त एकच आहे की तिच्या पोस्ट खाली ज्या कमेंट केल्या जातात हेच तिला उत्तर असणार आहे,” असे त्या म्हणाल्या.

शिवसेना उबाठा गटातील ५० नगरसेवकांनी शिंदे गटात पक्षप्रवेश केला आहे. यावर बोलताना त्या म्हणाल्या, “चाळीस आमदार गेले कित्येक खासदार गेले, लोकसभेचे चित्र आपण पाहिला आहे. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे त्यात इतका पाऊस पडतो आहे. या गर्दीत काही कमी राहिली आहे का ? हा प्रश्न माझा तुम्हाला आहे ही निष्ठावतांची गर्दी आहे. त्यामुळे ४० काय ४०० डोकी जात असतील तर सामान्य जनता आणि निष्ठावंत शिवसैनिक हा उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे.”

हे ही वाचा:

शिवसैनिकांसाठी काळा दिवस! Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसावरून Sheetal Mhatre यांची ‘X’ पोस्ट चर्चेत

Uddhav Thackeray यांनी संकटकाळात मुख्यमंत्री म्हणून केलेलं नेतृत्त्व लोकं विसरलेले नाहीत: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version