मुख्यमंत्री होण्याआधी पक्ष संघटनेला वेळ द्यायला हवा होता – संजय जाधवांचा उद्धव ठाकरेंना टोला.

मागील गेल्या अडीच वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाली. लोकांना जे कधी स्वप्न तेही वाटलं नव्हता ते सगळे रंजक प्रकार आपल्याला बघायला मिळाले.

मुख्यमंत्री होण्याआधी पक्ष संघटनेला वेळ द्यायला हवा होता – संजय जाधवांचा उद्धव ठाकरेंना टोला.

मागील गेल्या अडीच वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्राच्या ( Maharashtra) राजकारणात बरीच उलथापालथ झाली. लोकांना जे कधी स्वप्न तेही वाटलं नव्हता ते सगळे रंजक प्रकार आपल्याला बघायला मिळाले. मग तो पहाटेचा शपत विधी असो व नंतर तयार झालेल तीन चाकाच सरकार असो. ह्या सरकारनी अडीच वर्ष आपली सत्ता अनुभवली . नंतर शिंदे गटाच्या बंडखोरीने हे सरकार कोलमडून पडल. त्याचे पडसाद आजही आपल्याला बघायला मिळत आहेत. सध्या ह्याच सत्ता संघर्षाचा खटला न्यायालयामध्ये चालू असतानाच ठाकरे गटाचे खासदार असलेले संजय जाधव (sanjay jadhav) ह्यानि खळबळ जनक वक्तव्य केला आहे . संजय जाधव म्हणाले कि उद्धव ठाकरे ( uddhav thackeray) ह्यांनी सत्ता स्थापन करण्याच्या काळात मुख्यमंत्री होण्याआधी पक्षाला वेळ द्यायला हवा होता . तो काळ शिवसेनेसाठी (shivsena) , राजकारणासाठी खूप महत्वाचा काळ होता परंतु तेव्हाच पक्षाकडे दुर्लक्ष झाल्याने आज हि वेळ आली आहे.

 

त्यापुढे बोलताना संजय जाधव असाही म्हणाले कि जर साहेबाना मुख्यमंत्री व्हायचं होत तर त्यानी त्यांच्या मुलाला मंत्री करायला नको हवं होत, त्याने जागा आडकवल्या सारख्या झाल्या . दोन-दोन महत्वाची पद जर त्यांच्या कडे असतील तर हे पक्षा सोबत गद्दारी केल्यासारख होत. जर आदित्य ठाकरे ह्यांना मंत्री करायचं होता तर उद्धव ठाकरे ह्यांनी पक्षाची धुरा सांभाळायला हवी होती नाहीतर स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर आदित्य ठाकरे ह्यांना पक्षाचे काम सांभाळायला लावले पाहिजे होते. तस झाला नाही म्हणून लोकांमध्ये नाराजी वाढली असावी. बाप गेला कि मुलगा पुढे उभा राहणार ह्या भावनेतून गद्दारी झाली असावी अस देखील संजय जाधव यांनी ह्यावेळेस नमूद केले. संजय जाधव हे ठाकरे गटातील खासदार आहेत ,त्यांनी हे वक्तव्य केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहे. ठाकरे गटामध्ये अजूनही नाराजीचा वातावरण चालू आहे का असा प्रश्न आता सर्व जण विचारू लागले आहे. आता ह्या वक्तव्याचे पडसाद नेमके कसे आणि कोणाच्या फायद्याचे पडतात हे बघण्यासारखे असणार आहे.

संजय जाधव ह्यांची कारकीर्द –
संजय जाधव हे मूळचे परभणीचे आहेत तिथेच त्यांनी संभाजी मित्र मंडाळाची स्थापना करून सामाजिक काम सुरु केले नंतर गणेश उत्सव , नवरात्र उत्सव ह्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली. पुढे २००४ मध्ये ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून विधान सभा निवडून आले. २००९ मध्ये देखी ते विधान सभेचीच निवडणूक लढले. नंतर २०१४ आणि २०१९ ला लोक सभा निवडणूक लढले. ते आजही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत. शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

हे ही वाचा :

Holi 2023, मध्य रेल्वेकडून कोकणवासियांसाठी खुशखबर!, होळीसाठी सोडण्यात येणार विशेष ट्रेन

कोल्हापुरात जुन्या पेन्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

 

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version