Sanjay Raut News: मनी लॉन्ड्रींग प्रकरणी संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरु असलेली आरोप प्रत्यारोपांची मालिका उभा महाराष्ट्र पाहतो आहे. या कारवायांविरुद्ध आता महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे जेष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.

Sanjay Raut News: मनी लॉन्ड्रींग प्रकरणी संजय राऊतांचं फडणवीसांना पत्र

राज्यात महाविकास आघाडीचे अनेक नेते ईडीच्या रडारवर आहेत. एकीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते आमदार हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अनिल परब यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक नेते ईडीच्या निशाण्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडी कारवाईचा सिलसिला सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या या कारवायांमुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरु असलेली आरोप प्रत्यारोपांची मालिका उभा महाराष्ट्र पाहतो आहे. या कारवायांविरुद्ध आता महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे जेष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.

भाजपचे आमदार राहुल कूल यांच्या दौंडमधील भीमा साखर कारखान्यामध्ये ५०० कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी या पत्रामध्ये केला आहे. हा साखर कारखाना आमदार राहुल कूल यांच्या मालकीचा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे विधिमंडळाबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर संजय राऊत यांच्यावर सत्ताधारी आमदारांनी हक्कभंगाची कारवाईची मागणी केली गेली होती. या कारवाईसाठी निवडण्यात आलेल्या हक्कभंग चौकशी समितीचे आमदार राहुल कुल हे प्रमुख आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संजय राऊतांच्या आरोपांवर काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केलं आहे.

काय आहे संजय राऊत यांचे ट्विट…

“मा. देवेंद्र जी भीमा सहकारी साखर कारखान्याचे प्रकरण आपल्याकडे पाठवीत आहे. शेतकरी लुटला गेलाय हे स्पष्ट दिसत आहे. ५०० कोटीचा mony laundring व्यवहार आहे. निःपक्ष चौकशीची आपल्या कडून अपेक्षा आहे” असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. तसेच या ट्विटसोबत त्यांनी या गैरव्यवहाराबद्दलची माहितीही जोडली आहे.

हे ही वाचा :

PM Narendra Modi : जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्मचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

Maharashtra Unseasonal Rain: राज्यात उद्यापासून अवकाळी पावसाचा इशारा, पिकांना फटका बसण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version