सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊतांची आक्रमक भूमिका – ७२ तासात हे सरकार जाणार

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊत आक्रमक भूमिका - ७२ तासात हे सरकार जाणार"७२तासात हे सरकार जाणार.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर संजय राऊतांची आक्रमक भूमिका – ७२ तासात हे सरकार जाणार

“७२तासात हे सरकार जाणार. ७२ तास मी आधीही बोललो होतो आता वेळ आलीय”, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत . ते नाशिकमध्ये बोलत होते. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना झापल्यानंतर आता ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आमदार अपात्रता प्रकरणात राहुल नार्वेकरांनी वेळकाढूपणा केल्याचा अप्रत्यक्ष ठपका सुप्रीम कोर्टाने ठेवला. शिवाय पोरखेळ लावलाय का अशा कडक शब्दात कोर्टाने नार्वेकरांना सुनावलं आहे.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
– विधानसभेचे अध्यक्ष हे खडे बोल सुनावण्याच्या योग्यतेचे आहेत
– ज्या गांभीर्याने संविधान घ्यायला पाहिजे त्या गांभीर्याने घेत नाही
– तुम्ही सर्वोच न्यायालय काय नौटंकी समजलात का
– सो सोनार की एक लोहार की
– विधानसभा अध्यक्ष यांनी आणि त्यांच्या पालकांनी शहाणपण घेतला तर बरं आहे
– अन्यथा हे लोक न्यायव्यवस्था कशी पायदळी तुडवतात हे उघड होईल
– आम्हाला आदेश द्यावा लागेल असे न्यायालयाने संगीतल आहे
– हे दहा पक्ष फिरून बारा गावचं पाणी पिलेले लोक आहेत

– यांना पक्षांतर, घटना बाह्य सरकार याच्याशी घेणं नाही
– यांना दिल्लीच्या आदेशाने सरकार वाचवायचं आहे
– घटना पदावर बसलेल्या व्यक्तीने नीतिमत्ता आणि मर्यादा ठेवली पाहिजे
– विधानसभा अध्यक्षांना आवाहन, बाबासाहेबांचे संविधान हल्ल्यात घेऊ नका
– सरकार जाण्याची वेळ आता आली आहे
– जितका वेळ icu मध्ये ठेऊन वाचवायचे होते ते अध्यक्ष यांनी वाचवले आहे
– आता विधानसभा अध्यक्षांना icu मध्ये ठेवण्याची वेळ आली आहे
– कायदा एकच आहे त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना ला हा निर्णय लागू होईल
– हा एक चपराक आहे, न्यायालयाने हातोडा विधानसभा अध्यक्ष यांच्या टाळक्यात मारला आहे
– सरकार 72 तासात जाणार
– दिल्लीत जाऊन आदेश घेऊन येतात,योग्य वेळी योग्य निर्णय त्यांनी आम्हाला सांगू नये
– तुमचा निर्णय आम्ही करु,2024 पर्यंत पण थांबण्याची गरज नाही

विधानसभा अध्यक्षांनी ICU मध्ये टाकून सरकार वाचविण्याचा प्रयत्न केला. पण आता त्यांनाच ICU मध्ये जाण्याची वेळ आली आहे. सौ सोनार की एक लोहार की असं आजचं न्यायालयाचे मत आहे. हातोडा मारला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

हे ही वाचा: 

‘टायगर 3’ मधला सलमान खानचा जबरदस्त लूक

आरोग्य विभागासाठी सरकारची उदासीनता का?

Follow Us

Exit mobile version