Saturday, July 6, 2024

Latest Posts

शिक्षकांवर शेअर बाजाराप्रमाने भाव लावला जात आहे, Sanjay Raut यांचे CM Eknath Shinde गंभीर यांच्यावर आरोप

शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत.

शिवसेना उबाठा पक्षाचे (Shivsena UBT) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज (रविवार, २३ जून) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांवर गंभीर आरोप केले आहेत. शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांवर (Teachers Constituency Election) भाष्य करत ते म्हणाले, “महाराष्ट्राला शिक्षणाची, शिक्षकांच्या पेशाची परंपरा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री, शेअर बाजाराप्रमाने शिक्षकांवर भाव लावला जात आहे,” असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी काल (शनिवार, २२ जून) नाशिक येथे दौरा केला होता. नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांच्या (Nashik Teachers Constituency) पार्श्वभूमीवर काल त्यांची बैठकही पार पडली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्री येऊन गेले आणि मुख्यमंत्री निवडणुकीत कशासाठी येतात हे सगळ्यांना माहिती आहे. महाराष्ट्राला शिक्षणाची, शिक्षकांच्या पेशाची परंपरा आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री, शेअर बाजाराप्रमाने भाव लावला जात आहे. शिक्षकांना विकत घेण्याचा प्रयत्न करुन नका. महाराष्ट्राची परंपरा मोडू नका, शिक्षकांना बाजारात उभं करु नका,” असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “हेलिकॉप्टर मध्ये २० कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. सुषमा अंधारे यांनी त्याबाबत व्हिडीओ दिला. पदवीधर, शिक्षक या वर्गाला बाजारात ओढू नका. उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहत आहेत. लोकशाही ची हत्या होत आहे. या भारताचे निवडणूक धृतराष्ट्र प्रमाणे पाहत आहे. दिंडोरीत कोणती तरी भगरे नावाचा निवडणुकीत उभा राहतो. भास्कर भगरे यांच्या नावांप्रमाने भास्कर भगरेला गुरुजी लावले नाही. तिसरी पास ला सर लावले. त्याला पिपाणी चिन्ह दिले. लोकांना फसवणूक मत घेणे सुरूआहे. डमी उमेदवाराची ही पद्धत बंद व्हायला पाहिजे. लोकांना भ्रमित केलं जात आणि मत घेतली. यातून मार्ग काढावा लागेल. संदीप गुळवे यांना मत द्यायचे तर डुप्लिकेट ला दिलं जातं. आदिवासी आणि शेतकरी वर्ग चुकतो. लोकांनी शिवसेना समजून धनुष्यबाणला मत दिली. पण त्यांना उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते.”

हे ही वाचा

…तर त्याची जबाबदारी केंद्र सरकारची असेल; Jayant Patil यांचा मोदी सरकारवर निशाणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss