Uddhav Thackeray and Sanjay Raut Live : राऊतांच्या धाडसाचे कौतुक करत, केंद्रीय यंत्रणायाना पाळीव प्राणी म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर साधला निशाणा

Uddhav Thackeray and Sanjay Raut Live : राऊतांच्या धाडसाचे कौतुक करत, केंद्रीय यंत्रणायाना पाळीव प्राणी म्हणत उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर साधला निशाणा

खासदार संजय राऊत उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. ते घरी पोहचताच आदित्य ठाकरेंनी संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाल, संजय राऊत यांचं कौतुक वाटतं. ते लढले. पुन्हा त्यांना एखाद्या केसमध्ये त्यांना गोवण्यात येऊ शकता. सत्ताधाऱ्यांकडून न्यायव्यवस्था अंकित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारचे पाळीव प्राणी असल्या सारखं वागत आहे. असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

हेही वाचा :

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत कोणते तीन खेळाडू भारतासाठी गेम चेंजर ठरतील? जाणून घ्या 

पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, मला माहीत होतं ठाकरे कुटुंबीय माझ्या घराची काळजी घेतील. पक्षासाठी मी आणखी दहा वेळा तुरुंगात जाण्यासाठी तयार आहे. मी एकटा नाही तर माझे कार्यकर्ते पक्ष माझ्यासोबत आहेत. ठाकरेंच्या तीन पिढ्यांसोबत माझं नातं कायम असेल. तुरुंगातील प्रश्न मांडण्यासाठी फडणवीस यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची घटना गोठवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचंही ते यावेळी म्हणालेत.

Sanjay Raut: खासदार संजय राऊत मातोश्रीवर दाखल; आदित्य ठाकरे – संजय राऊतांची गळाभेट

Exit mobile version