spot_img
Sunday, September 15, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केला हल्लाबोल, कालची माफी फक्त राजकीय…

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर माफी मागितली.

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर माफी मागितली. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत, मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन माफी मागतो. जे शिवछत्रपतींचा आदर करतात, त्यांना पूजतात, त्यांचीही मी माफी मागतो, असे त्यांनी म्हटले. आम्ही ते लोक नाही जे भारताचे सुपुत्र वीर सावरकरांचा अपमान करतो, आमच्यावर ते संस्कार नाही, असे म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात संतापाचा लाव्हा उसळला. ते सर्व पंतप्रधान मोदींनी पाहिलं. आपण जर माफी मागितली नाही तर भविष्यात महाराष्ट्रातील संतापाला तोंड द्यावं लागेल हे लक्षात आलं. म्हणून त्यांनी काल राजकीय माफी मागितली. उद्याच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून माफी मागितली, ही फक्त ‘राजकीय माफी’ होती अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. त्यांनी माफी मागितली असली तरी मविआने जाहीर केलेल्या जोडे मारो आंदोलनात कोणताही बदल होणार नाही, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

तसेच यावेळी बोलत अत्स्ना संजय राऊत म्हणाले आहेत की, छ. शिवरायांचा घोर अपमान महाराष्ट्रात,सरकारकडून झालाय. मोदींनीच निर्माण केलेलं हे सरकार आणि संकट आहे. मोदींनी त्यांचं काम केलं, पण महाराष्ट्रही त्याचं काम करेल, कर्तव्य पार पाडेल. मोदींनी माफी मागितली असली तरी उद्यापासून राज्यभरात सरकारला जोडे मारो आंदोलनात कोणताही बदल होणार नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. छ. शिवाजी महाराज यांच्याविषयी प्रेम, महाराष्ट्राविषयी प्रेम, आत्मियता नाही. पण माफी मागून प्रश्न सुटत असेल तर माफी मागून टाकावी, असा सल्ला त्यांना या राज्यातल्या लोकांनी दिलेला दिसतो. पंतप्रधानांनी मागितलेली माफी पूर्णपणे राजकीय, या संकटातून सुटका करण्यासाठी हे (माफीचं) पाऊल उचललं. पण त्यामुळे प्रश्न सुटत नाही असे ते म्हणाले. छ. शिवरायांची मागितलेली माफी हा राजकीय विषय आहे. ती माफी मागितली नाही तर महाराष्ट्रच आपल्याला माफ करणार नाही, असं त्यांना वाटलं असेल. त्यातूनच ही माफी मागितली गेली. पण महाराष्ट्राने तुम्हाला माफ केलेलं नाही हे लवकरच कळेल, असं राऊत यांनी खडसावून सांगितलं.

हे ही वाचा:

“वाढवण बंदर आर्थिक व्यापाराचे केंद्र बनणार” – PM Narendra Modi

Congress ला मोठा मिळणार फटका; JItesh Antapurkar करणार BJP मध्ये एन्ट्री

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss