संजय राऊत यांनी केला बाळासाहेबांना फोन…

शिवसेनेतील अंतर्गत बंडानंतर राज्यातील संपूर्ण राजकारणालाच जणू काही कलाटणी मिळाली. राज्यात शिवसेनेचे दोन गट बघायला मिळाले आणि त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट असे दोन गट राजकारणात तयार झाले.

संजय राऊत यांनी केला बाळासाहेबांना फोन…

शिवसेनेतील अंतर्गत बंडानंतर राज्यातील संपूर्ण राजकारणालाच जणू काही कलाटणी मिळाली. राज्यात शिवसेनेचे दोन गट बघायला मिळाले आणि त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट असे दोन गट राजकारणात तयार झाले. राज्यासह संपूर्ण देशानंच अभूतपूर्व सत्तासंघर्ष बघितला आणि अनुभवला देखील. शिवसेनेती प्रबळ नेते म्हणून ओळख असणाऱ्या एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि त्यांच्यासह काही आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यानंतर शिंदे गटात इनकमिंग आणि ठाकरे गटात आऊटगोईंग सुरूच होतं. शिवसेनेत अंतर्गत फूट पडली. ठाकरे गटाकडून शिंदे गटाचा उल्लेख वारंवार गद्दार असा करण्यात येतो. त्यानंतर राज्यात सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. आता या सर्व घडामोडींची तक्रार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे केली आहे.

झी मराठीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या आयुष्यातील एका व्यक्तीला फोन लावण्याची संधी मिळते. अर्थात हा फोन पूर्णपणे काल्पनिक असतो. सध्या हयात असलेल्या किंवा हयात नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही फोन लावू शकता. अशी मुभा देखील दिलेली असते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गायक अवधूत गुप्ते करतात. दरम्यान, यापूर्वी संजय राऊतांपूर्वी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही हजेरी लावली होती. त्यानंतर शोच्या आगामी एपिसोड मध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत देखील शूट करण्यात आला. नारायण राणे हे जेव्हा आले होते तेव्हा कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं, नारायण याला खासदार करायचंय आपल्याला. मी फक्त त्यांचा शब्द पूर्ण केलाय, असं ते म्हणाले होते. यालाही संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राणे खोटं बोलतायत. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची खासदारकी जाऊ शकते, असंही संजय राऊत म्हणाले. अवधूत गुप्ते यांनी संजय राऊत यांना कार्यक्रमातुन तुम्ही कोणाला फोन लावाल? असा प्रश्न विचारला. तेव्हा संजय राऊत यांनी मागचा पुढचा विचार न करता थेट बाळासाहेब ठाकरेंना फोन लावला. बाळासाहेबांना फोन करुन राऊतांनी त्यांच्याकडे शिवसेनेतील अंतर्गत फुट आणि त्यानंतर उद्भवलेल्या सत्तासंघर्षाबाबत तक्रारी केल्या आहेत. तसेच, संजय राऊत यांनी बाळासाहेबांना आश्वासनंही दिली आहेत.

संजय राऊत यांनी बाळासाहेबांना फोन लावला आणि हॅलो बाळासाहेब…. नमस्कार! अशी सुरवात संजय राऊत यांनी केली. आणि बोलायला सुरवात केली. तुम्ही आम्हा लोकांना सांगितलं की, शिवसेना सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. ज्या धनुष्यबाणाची आपण पूजा करत होतो. तोच धनुष्यबाण स्वत:ला महाशक्ती म्हणवणाऱ्यांनी चोरलाय. पण तुम्ही खात्री बाळगा. आमचा कणा अजूनही मोडलेला नाही, तुम्हाला अपेक्षित असेलेली शिवसेना तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल, असं आश्वासन संजय राऊत यांनी या फोनवर बोलताना बाळासाहेबांना दिलं. तुम्ही शिवसैनिकांना एक वाक्य नेहमीच सांगायचात की, आपण सत्तेसाठी जन्म नाही घेतलाय, तर सत्तेनं आपल्यासाठी जन्म घेतलाय. हे लक्षात ठेवून आम्ही पुढे जाणार आहोत, असा शब्दही संजय राऊतांनी बाळासाहेबांना दिला.

हे ही वाचा:

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या यादीच्या कट ऑफने ओलांडली नव्वदी..

आय ए एस अधिकारी अनिल रामोड यांच्या संदर्भात मोठी बातमी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version