spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावातून धूर निघतोय संजय राऊत यांचा दावा

CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सातारा जिल्ह्यातील कोयना विभागात सुट्टीवर आपल्या मूळ जन्मगाव दरे तांब येथे गेले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एखादा मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा व तर्कवितर्क काढले जात आहेत.

CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सातारा जिल्ह्यातील कोयना विभागात सुट्टीवर आपल्या मूळ जन्मगाव दरे तांब येथे गेले आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एखादा मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर अचानक रजेवर जाण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं राजकीय वर्तुळात मोठी चर्चा व तर्कवितर्क काढले जात आहेत. मुख्यमंत्री नेमकं कोणत्या कारणासाठी सुट्टीवर  गेलेत , याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या राजकारणात आपपल्या परीने केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या या सुट्टीबाबतची माहिती दिलेली नाही. मात्र तीन दिवस मुख्यमंत्र्यांचे दौरे तसेच अन्य शासकीय कामांचे नियोजन नसणार आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबतची बैठक आटपून सातारा गाठलं आहे.

सत्तासंघर्षाचा निकाल जवळ आला आहे, तसेच राज्यातील राजकीय वातावरण पाहता, जर सर्वोच्य न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेला तर शिंदे गटाच्या अडचणी वाढणार आहेत. म्हणून निकाल आपल्याच बाजूने लागावा यासाठी देखील शिंदे देवाला साकडं घालण्यासाठी गेल्याच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या तीन दिवसीय सुट्टीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी भाष्य केल आहे. साताऱ्याला रजेवर गेलेल्या मुख्यमंत्रांनी यज्ञात कुठला कागद टाकला ते चेक करावे. मुख्यमंत्र्यांच्या येथून कुठून तरी धूर येतोय असं एका वृत्तपत्रात वाचलं असं संजय राऊत म्हणाले. काय जळते कसला दूर येतोय हे माहित नाही असंही यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत. तर काल उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मुख्यमंत्री जत्रेसाठी गावी गेल्याच पत्रकारांशी बोलताना म्हंटल होतं. राज्यातील राजकारणात वेगवेगळ्या राजकीय चर्चाना उधाण आले असताना मुख्यमंत्र्यांचे अचानक असे गावी जाणे अनेक उलट सुलट चर्चाना बळ देत आहे. संजय राऊंतांच्या या आरोपानंतर आता शिंदेच्या शिवसेनेकडून काय उत्तर येत हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचा : 

मातोश्रीची माहिती देणाऱ्या खबऱ्यांना फक्त किरीट सोमय्यावर विश्वास आहे – किरीट सोमय्या

उद्योगमंत्री उदय सामंतांनी शरद पवारांची घेतली भेट, बैठक घेऊन निर्णय घेण्याचे उदय सामंतांचे शरद पवारांना आश्वासन…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss