Sunday, July 7, 2024

Latest Posts

Sanjay Raut यांची ठाकरेंवर टीका, ‘प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा…

काल दिनांक १० मे गुरुवार रोजी पुण्यामध्ये राज ठाकरेंची जाहीर प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेदरम्यान राज ठाकरे 'मशिदमधून जर महाविकास आघाडीला मत देण्याचे फतवे काढले जात असतील तर, आम्ही देखील हिंदूंना फतवा काढतो कि, त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मत द्यावी' असे म्हणाले.

काल दिनांक १० मे गुरुवार रोजी पुण्यामध्ये राज ठाकरेंची जाहीर प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेदरम्यान राज ठाकरे ‘मशिदमधून जर महाविकास आघाडीला मत देण्याचे फतवे काढले जात असतील तर, आम्ही देखील हिंदूंना फतवा काढतो की, त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मत द्यावी’ असे म्हणाले. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी राज ठाकरेंवरती खडसून टीका केली आहे. राज ठाकरे जर महाराष्ट्रद्रोहींच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील’ अशी टीका देखील त्यांनी केली. सकाळी संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली, मशिदमधून जर महाविकास आघाडीला मत देण्याचे फतवे काढले जात असतील तर आम्ही देखील हिंदूंना फतवा काढतो या राज ठाकरेंच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘काढा फतवा काढा, ते आता फतव्याकडे वळले आहेत. काही नेते आणि काही पक्ष यांची फार दाखल घ्यावी अशी स्थिती महाराष्ट्रातील स्थिती नाही’. तसेच संजय राऊत यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांचा उल्लेख महाराष्ट्रद्रोही असा केला आहे.

याचबरोबर, संजय राऊत असेही म्हणाले की, ‘महाराष्ट्रासह देशभरात संविधान वाचवण्याची मोठी लढाई चालू आहे, देशातील लोकशाही, स्वतंत्र आणि संविधान धोक्यात आलेले असताना या देशातील सर्व जातीधर्माचे लोक संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरू इच्छित आहे. पण त्याच वेळेला राज ठाकरेंसारखे नेते या महाराष्ट्रद्रोहीच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्याला किती वेदना होत असतील याची कल्पना न केलेलीच बरी. ठाकरे परिवाराने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. आणि त्याच कुटुंबातील एखादी व्यक्ती महाराष्ट्रावर औरंगजेबी चाल करण्यार्यांना मदत करणार असेल तर प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा स्वस्थ बसणार नाही’ अशी खोचक टीका संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केली आहे.

काल अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामीन मंजूर झाली असून २ जून पर्यंत अरविंद केजरीवाल यांना जेल मधून प्रचारासाठी मुक्त करण्यात आले आहे. याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली की, १७ मे रोजी महाविकास आघाडीची सांगता सभा होणार असून त्या सभेला अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत. १७ मे रोजी मुंबईमध्ये नरेंद्र मोदी सुद्धा असणार आहेत. आणि त्याच वेळी व्यासपीठावर अरविंद केजरीवाल देखील असतील असेही संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

Raj Thackeray यांचा फतवा, हिंदूंनी फक्त महायुतीलाच मतदान करा…

VBA ला मतदान करून मत वाया घालू नका, Dr. Kalyan Kale यांचे मतदारांना आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss