Dharmaveer 2 अत्यंत बोगस, बकवास आणि काल्पनिक सिनेमा: Sanjay Raut

Dharmaveer 2 अत्यंत बोगस, बकवास आणि काल्पनिक सिनेमा: Sanjay Raut

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) अनुषंगाने राज्यात मोठी धामधूम सुरु असल्याचे चित्र आहे. अश्यातच निवडणुकीच्या तोंडावर ठाण्यातील दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यावर आधारित ‘धर्मवीर २’ चित्रपट (Dharmaveer 2) काल (शुक्रवार, २७ ऑगस्ट) रिलीज झाला. यावरून आधीच मोठा वाद निर्माण होत असून आता चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यात आणखी भर पडली आहे. यावरून आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या असून शिवसेना उबाठा (Shivsena UBT) गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावरून या चित्रपटासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावरही निशाणा साधला आहे. धर्मवीर २ हा अत्यंत बोगस, बकवास आणि काल्पनिक सिनेमा असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

संजय राऊत यांनी आज (शनिवार, २८ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत यावर भाष्य केले. ते यावेळी म्हणाले, “जसजसे निवडणूक आहेत तसेच धर्मवीर एक, दोन, तीन, चार, पाच असे चित्रपट येत राहतील. यांना आम्ही जास्त ओळखतो. दिघे साहेबांचे निधन २००१ साली झाले, राज ठाकरे यांनी पक्ष २००५ साली सोडला. ज्यांनी पक्ष सोडला २००५ ला त्यांच्याबाबत २००१ साली स्वर्गवासी झालेले आनंद दिघे बोलत आहेत. अत्यंत बोगस आणि बकवास सिनेमा आहे, काल्पनिक गोष्टींवर याच्यावर विश्वास ठेवून ते एक प्रकारे दिघे साहेबांचे चारित्र्य हणन केला आहे. सिनेमा लावला होता टीव्हीला.. मी कुठेतरी होतो आणि मला दिसलं मला धक्का बसला. ज्या गोष्टीला मी साक्षीदार आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर त्या इस्पितळातल्या त्यांचा मृतदेह खांद्यावर टाकून आताचे मुख्यमंत्री उतरत आहेत. खांद्यावर पार्थिव घेऊन शिंदे पळत आहेत. कोण बनवत आहे हे? कोण लिहीत आहे? हा आनंद दिघे यांचा अपमान आहे आणि त्यांचे समर्थक यांचा देखील अपमान आहे. अशा गोष्टी त्याच्यात दाखवल्या आहेत,” असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “पाठवून द्या ऑस्करला हा सिनेमा… ऑस्कर मधला हा सिनेमा आहे. एक डुप्लिकेट ऑस्कर लावून टाका पाचपाखाडी मध्ये… ऑस्करच्या ऑफिस टाका नाहीतर ओवळा माजिवडामध्ये आणि एक ऑस्करचा पुरस्कार त्यांना देऊन टाका. आनंद दिघे यांची डेड बॉडी घेऊन मुख्यमंत्री पळत आहेत आणि आनंद दिघे यांचे हात असे लटकत आहेत काय आहे हे ? पण हे पैशाच्या लालच मध्ये लेखक, दिग्दर्शक, कलाकार आणि पिक्चर बनवत आहेत. हा आनंद दिघे यांचा सर्वात मोठा अपमान आहे. पण ज्या पद्धतीने आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर जो वापर केला जात आहे. हा घृणास्पद हास्यास्पद आणि लाजिरवाणी गोष्ट आहे. हा प्रचार पण नाही आहे हा दिघे यांचा अपप्रचार आहे. असा बकवास सिनेमा माझ्या आयुष्यात कधी बघितला नाही. आनंद दिघे यांचे संपूर्ण आयुष्य आमच्या समोर आहे, त्यांच्या अनेक गोष्टीला मी साक्षीदार आहे, अनेक खटल्यात मी त्यांच्यासोबत साक्षीदार आहे. त्यांच्या मृत्यूच्या वेळेला तिकडे आम्ही उपस्थित होतो. या चित्रपटाचे कोणी तिकीट काढून जाणार नाही. त्यांनी एक ओळ टाकली पाहिजे या सिनेमातील कथाकाचा सत्य आणि वास्तविकतेशी काही संबंध नाही, कारण हे सत्यच नाही,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकांच्या निकालानंतर ठाकरे गटाने विरोधकांना डिवचलं, बाप को हात लगानेसे पहले…

‘मुंबईत हायअलर्ट’? दहशतवादी मोठ्या हल्ल्याची भीती, पोलीस ऍक्शन मोडवर…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version