spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सोडले शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडल आहे.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीकास्र सोडल आहे. मुंबईमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. “देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना ‘सत्तेत आल्यास दोन दिवसांत आरक्षण देतो’, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे न्यायालयात नेमकं काय होतं, याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. असेच संजय राऊत यांनी सांगितले की , इतर सर्व विषयातील निकाल न्यायालयात मॅनेज केले जातात. मग महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या समाजासाठी असलेल्या आरक्षणाचा निकाल आपल्या मनासारखा का लागत नाही?” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

ज्या वेळी फडणवीस विरोधी पक्षनेते होते तेव्हा ते म्हणले होते आमच्या हातात सत्ता द्या, लगेच मराठा आरक्षण देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. मग आता शिंदे फडणवीस सरकारच्या हातात नऊ महिन्यांपासून सत्ता अली असून देखील अगदी सीमाप्रश्नापासून ते मराठा आरक्षणापर्यंत कोणताही निकाल आमच्या मनासारखा लागत नाही. याचं का कारण काय? या विषयावर तुमची दातखिळी का बसली आहे? असा जाब संजय राऊत यांनी विचारला आहे. आमच्या हातातून धनुष्यबाण चिन्ह काढून घेताना तुमच्या तात्काळ हालचाली होतात , मग हा मराठा आरक्षणाचा मुद्दा हाताळताना तुम्ही कुठे कमी पडताय किंवा तुम्हाला कुठे अडचणी येतंय? हे तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायला हवं”, अशी टीकाही त्यांनी केली.

या सर्व टीकास्त्रानंतर दुपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की ,जर राजकारणातील कटुता संपवायची असेल तर सकाळचा अभंग बंद करायला हवा, असा टोला संजय राऊत यांना लगावला आहे. त्या टोल्यालाही संजय राऊत यांनी राऊतांनी प्रत्युत्तर दिलं. “आमच्या अभंगात फडणवीसांनी सहभागी व्हावं. त्यांनी अभंगाची चेष्टा करू नये. अभंग ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. तुमच्यात हिंमत असेल तर अभंगाला उत्तर द्या”, असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

संजय राऊत यांच्याकडून खारघर दुर्घटनेप्रकरणी २ दिवसाचं अधिवेशन घेण्याची मागणी

मुख्यमंत्री पदाने कितीदा केलंअजित दादांना निराश, पवाराचं स्वप्न सत्यात उतरेल?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss