मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर संजय राऊतांची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दावोस दौऱ्यावर संजय राऊतांची टीका

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. आणि दौऱ्यावर ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नाकासमोरून उदयॊग पळवून नेले त्याचं काय? असा प्रश्न सुद्धा यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला. सरकार संपूर्ण न्याययंत्रणा ताब्यात घेऊ इच्छते. इतर सर्व यंत्रणा त्यांनी ताबयात घेतल्या आहेत. निवडणूक आयोग असेल वृत्तपत्र असेल संसद असेल किंवा प्रशासन असेल आता फक्त न्यायवेवस्थेवर हातोडा घालण्याचं बाकी आहे, आणि त्याचे प्रक्रिया सुद्धा सुरु झाली आहे. असं संजय राऊत यांनी या सांगितलं.

दावोसमधून काय येतं ते माहीत नाही. तुमच्या नाकासमोर जे उद्योग पळवून नेले ते परत आणा. वेदांत, एअरबससारखे प्रकल्प महाराष्ट्र बाहेर गेले. दोन लाख कोटीच्यावरची गुंतवणूक तुमच्या नाकासमोर गुजरात आणि इतर राज्य घेऊन गेले. ते आधी घेऊन या, असं संजय राऊत म्हणाले. दावोसचे करार कसे होतात हे आम्हाला माहीत आहे. तिकडे जगभरातून राज्यकर्ते येतात. आपले करार करतात. मग तुम्ही सांगता पाच लाख कोटीचे करार झाले, दहा लाख कोटींचे करार झाले… आतापर्यंत राज्यकर्त्यांनी दावोसला जाऊन किती कोटीचे करार केले ते प्रुव्ह करू शकले नाही, असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दावोसच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंतही आहेत. दावोसमध्ये मोठ्या प्रमाणावर करार होणार असून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक येणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे

हे ही वाचा:

गुलाबराव पाटलांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, उद्धव ठाकरे यांनी चूक…

दादा भुसेंच्या घरावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच आंदोलन

भाजपा नेते किरीट सोमय्या आज कोल्हापूर दौऱ्यावर, अंबाबाईचं घेणार दर्शन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version