वंचित आणि शिवसेनेच्या युतीबाबत संजय राऊतांनी दिली मोठी माहिती

वंचित आणि शिवसेनेच्या युतीबाबत संजय राऊतांनी दिली मोठी माहिती

काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aaghadi) युती बाबत मोठ्या प्रमाणत चर्चा होतांना दिसाय होत्या. तर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी वंचित आणि शिवसेनेच्या युतीबाबत मोठी माहिती दिली आहे. संजय राऊत यांना युतीबाबत विचारलं असता यावर उद्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाष्य करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे वंचित आणि शिवसेनेच्या युतीची उद्या अधिकृतपणे घोषणा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पुढे संजय राऊत म्हणाले, “उद्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. हा दिवस देशभरात साजरा केला जातो. हा एक प्रेरणा दिवस आहे. साहेब जरी आज आपल्यात नसले तरी त्या दिवसाचं महत्त्व आणि शक्ती तशीच आहे. यानिमित्त उद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शमुखानंद सभागृहात (Shamukhananda Auditorium) शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व गेटवे ऑफ इंडियाजवळ (Gateway of India)असलेल्या शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्याजवळ जाऊन अभिवादन करू, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. तसेच उद्या राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत”, असे ते म्हणाले.

संजय राऊत हे भारत जोडो यात्रेत (India Jodo Yatra) सहभागी झाले होते. यावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. यासंदर्भात बोलताना, “जे लोक अशी टीका करतात, ते टपल्या आणि टीपल्या स्वत:शीच मारत बसतात. त्यांच्याकडे फार देण्याची गरज नाही. संपूर्ण देशामध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा होते आहे. त्याची भीती त्यांना वाटतं”, असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.

हे ही वाचा:

आताची मोठी बातमी ! अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी

दैनिक ‘सामानाच्या’ जाहिरातीमधून शिंदे गटावर हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version