संजय राऊत यांच्याकडून खारघर दुर्घटनेप्रकरणी २ दिवसाचं अधिवेशन घेण्याची मागणी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या दुर्घटनेत १४जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या दिवशी नवी मुंबईत ३९ ते ४१ अंश सेल्सिअस तापमान होतं. त्या तापमानात शरीरातील पाणी कमी झालं, आणि सोबतच रक्तातील प्रोटिन्सवर परिणाम झाल्याचं वैद्यकीय निरीक्षण आहे.

संजय राऊत यांच्याकडून खारघर दुर्घटनेप्रकरणी २ दिवसाचं अधिवेशन घेण्याची मागणी

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याच्या दुर्घटनेत १४जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेच्या दिवशी नवी मुंबईत ३९ ते ४१ अंश सेल्सिअस तापमान होतं. त्या तापमानात शरीरातील पाणी कमी झालं, आणि सोबतच रक्तातील प्रोटिन्सवर परिणाम झाल्याचं वैद्यकीय निरीक्षण आहे. खारघरमधील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्दैवी घटनेच्या संदर्भातील वस्तुस्थिती तपासण्याकरता एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. तर खारघरमधील महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

या घटनेवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचं दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संगितली. परंतु आता काही अंशी संजय राऊत यांनी खारघर दुर्घटनेत ५० जणांचा मृत्यू झाला, हे वक्तव्य खासदार संजय राऊतांना भोवण्याशी शक्यता आहे. कारण राऊतांविरोधात या वक्तव्याविरोधात शिवसेनेने मरिन लाईन्स पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट, भरत गोगावले, किरण पावसकर यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बागुल यांच्याकडे तक्रार केली आहे. संजय राऊतांचं हे वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारं आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे.खारघरमधील घटनेनंतर उष्माघात किती कडकी होता हे तर आपण स्वतः बघितलंच. तरी देखील खारघरमधील दुर्घटनेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.

या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळं मृत्यू झालेल्या श्रीसदस्यांच्या मृत्यूचं कारण प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या बहुतेक श्रीसदस्यांनी आधीच सहासात तासात पाणीच प्यायलं नसल्याचं दिसून आलंय. काहींच्या पोटात अगदी कमी प्रमाणात अन्न गेलं होतं, तर बहुतेक जणांच्या पोटात अन्नाचा कणही नसल्याचंही दिसून आलं.यासंबंधी एका महिन्याच्या मुदतीत दुर्घटनेबाबतचा अहवाल सादर करणार आहे. तसंच भविष्यात अशा प्रकारच्या समारंभाच्या आयोजनाच्या बाबतीत कोणत्या गोष्टींची काळजी- दक्षता घ्यावी, याबाबतही समिती सरकारला शिफारशी करेल. उन्हाळ्यात उष्माघातामुळे देशभरात होणारे हजारो मृत्यू टाळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने संपूर्ण देशासाठी एकसारखा हिट ऍक्शन प्लान तयार करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

सुषमा अंधारे यांनी केलेल्या आरोपावर प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं प्रतिउत्तर

राज ठाकरे वरळीच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version