Sanjay Raut Arrest : संजय राऊतांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी

संजय राऊत यांनी 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनवाली आहे.

Sanjay Raut Arrest : संजय राऊतांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी

मुंबई : पत्राचाल आर्थिक घोटाळा प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे सध्या ईडीच्या ताब्यात आहेत. त्यानंतर न्यायालयातील युक्तीवादा दरम्यान संजय राऊत यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी सुनवाली आहे. पत्राचाळ आर्थिक घोटाळाप्रकरणी ईडीने रविवारी तब्बल 9 तास संजय राऊत यांची चौकशी केली होती. त्यानंतर रात्री उशिरा राऊत यांना अटक करण्यात आले.

वकिलांचा युक्तिवाद

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा थेट सहभाग असून प्रविण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला असल्याचा आरोप ईडीने केला होता. तसेच या प्रकरणात संजय राऊत यांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितला सांगितले. संजय राऊत यांना जर सोडले तर ते पुन्हा तशा प्रकारचे कृत्य करु शकतात, त्यामुळे त्यांना आठ दिवसांची रिमांड देण्यात यावी अशी मागणी ईडीकडून करण्यात आली होती.

हेही वाचा : 

सच्चे शिवसैनिक झुकत नाही , मला राऊतांचा अभिमान आहे ; उद्धव ठाकरे

 

Exit mobile version