Sanjay Raut : संजय राऊतांची सुटका नाहीच, जामीन अर्जावरील पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला

Sanjay Raut : संजय राऊतांची सुटका नाहीच, जामीन अर्जावरील पुढील सुनावणी ९ नोव्हेंबरला

Sanjay Raut ED Raid

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. मात्र, त्यांना आणखी काही दिवस कोठडीत रहावे लागणार आहे. जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यावर निर्णय देताना कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली. आता ९ नोव्हेंबरला त्यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी होणार आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरण खासदार संजय राऊत आणि प्रविण राऊत हे दोघेडी न्यायलयीन कोठडीत आहेत. प्रविण राऊत आणि संजय राऊत यांच्या जामीनावर एकाच दिवशी ९ नोव्हेंबरला कोर्ट निर्णय देणार आहे. जामिनासंदर्भात ईडीने आज लेखी उत्तर सादर केले. कोर्टाने जामिनावरील निकाल राखून ठेवला आहे.

हेही वाचा : 

Happy birthday Shah Rukh Khan : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खानच्या वाढदिसानिमित्त खास फोटो

ईडीचा दावा काय?

दरम्यान, ईडीने केलेल्या दाव्यानुसार जीएपीसीएलने बेकायदेशीर कारवाईमधून १,०३९.७९ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. प्रविण राऊत यांना एचडीआयएलकडून १०० कोटी रुपये मिळाले. हे पैसे नंतर वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये वळवण्यात आले. ही खाती प्रविण राऊत यांच्या जवळचे, कुटुंबातले सदस्य आणि व्यावसायिकांची आहेत. ज्यात संजय राऊत यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे, असं इडीने सांगितले. २०१० साली संजय राऊत यांची पत्नी वर्षा यांच्या खात्यात प्रविण राऊत यांची पत्नी माधुरी यांनी ८३ लाख रुपये जमा केले होते.

IND vs BAN: भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी चांगली बातमी, पावसाची शक्यता पूर्णपणे संपुष्टात

मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील ६७२ कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी २००८ मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून ६७२ फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले. या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून १०० कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं.

आदित्य ठाकरेंनी सत्तारांचे चॅलेंज स्वीकारले; ७ नोव्हेंबरला सिल्लोडमध्ये शिवसंवाद यात्रा

Exit mobile version