संजय राऊतांनी Amit Shah यांना खडेबोल सुनावले

सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत आणि १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये जाहीर सभा झाली.

संजय राऊतांनी Amit Shah यांना खडेबोल सुनावले

सध्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा रंगल्या आहेत आणि १० जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये जाहीर सभा झाली. काल अमित शाह यांनी त्यांच्या सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी युतीमध्ये असताना वचन पाळले नाही. धोका दिला अन् काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊ बसले, अशी टीका अमित शाह यांनी केली होती. अमित शाह यांच्या टीकेला संजय राऊतांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली आणि त्यावेळी ते म्हणाले की, धोका कुणी कुणाला दिला हे सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील जनता जाणून आहे. तुम्ही धोका दिला नसता तर आज शिंदेंना तुम्ही मुख्यमंत्रीपदी बसवलं नसतं. अडीच वर्षापूर्वी संधी होती, तेव्हा तुम्ही शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिलं नाही. मुख्यमंत्रीपद देण्याची चर्चाच झाली नसल्याचं त्यावेळी तुम्ही म्हणाला होता. मग शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद कसं दिलं? शिवसेना फोडून तुम्ही शिंदे गटाला मांडीवर का घेतलं? तुम्ही खोटं बोलत आहात असे संजय राऊत म्हणाले.

पुढे संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी वाचन पळाले नाही. शब्द फिरवला. महाराष्ट्रातील जनता ही अमित शाह यांच्यापेक्षा आजही ठाकरे कुटुंबावरच विश्वास ठेवते. आजही या राज्याची जनता इतर कोणापेक्षाही ठाकरे कुटुंबावर विश्वास ठेवते आणि ते सांगतील ते ऐकतात. अमित शाह यांच्या पेक्षा अधिक ऐकतात. अमित शाह यांनी २० मिनिटाचं भाषण केलं. त्यात ७ ते ८ मिनिटं ते उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर बोलले. ही आनंदाची गोष्ट आहे. अजूनही त्यांच्या डोक्यात शिवसेनेचं भय आहे. शिवसेनेची भीती कायम असणं चांगलं आहे. आम्ही आमचा संघर्ष करत आहोत. आम्ही आव्हान निर्माण केले आहे असे संजय राऊत यांनी शाह यांना सुनावले.

हे ही वाचा:

राष्ट्रवादी काँग्रेसचा २४ वा वर्धापन दिन राष्ट्रवादी भवनमध्ये साजरा, जयंत पाटील म्हणाले…

सुप्रिया सुळे म्हणाल्या, सत्य परेशान हो सकता है लेकीन…

सु्प्रिया ताईंना अजितदादांची मदत मिळणार नाही? Will Ajit pawar support Supriya Sule

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version