संजय राऊत तुरुंगातूनही काडी पेटवतात; शहाजीबापूंचा टोला

संजय राऊत तुरुंगातूनही काडी पेटवतात; शहाजीबापूंचा टोला

अंधेरी पोटनिवडणुकीतून भाजपाने आपला उमेदवार मागे घेतला. राज ठाकरेंच्या आवाहनानंतर झालेल्या या निर्णयाचं सर्वच राजकीय पक्षांनी स्वागत केलं. संजय राऊतांनी मात्र यावरुन हे सगळं स्क्रिप्टेड आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. राऊत यांच्या या टीकेचा शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील (shahaji bapu patil) यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत तुरुंगातूनही काडी पेटवतात, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली आहे.

आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधतांना जोरदार टीका केली आहे. भाजपने उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला यातून राज्याची संस्कृती पुढे येताना दिसत आहे. राजसाहेबांच्या पत्राची फडणवीस यांनी तात्काळ दखल घेऊन पुढील कार्यवाही केली, असं सांगतानाच संजय राऊत हे नारद मुनीचे पात्र आहे. तुरुंगातूनही काडी पेटवत आहेत, असं शहाजीबापू पाटील म्हणाले. शिंदे साहेबांच्या नेतृत्वात यावं ही माझी इच्छा आहे. म्हणून अभिजीत पाटील यांच्याबाबत विधान केल. पण आपण निवडूनच येणार. माझी विधानसभा निवडणुकीत माघार नाही. सगळे विरोधक मिळून या. भुगा करुन तुम्हाला निवडणुकीत पाडून मी पुन्हा आमदार म्हणून मुंबईला जाईल, असा दावा त्यांनी केला.

उद्धव ठाकरे यांना काँग्रेसने भारत जोडो यात्रेला निमंत्रण दिलं आहे. पण उद्धव ठाकरे यांचं काँग्रेससोबत जाणं हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा करण्यासारखं आहे, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीवरही भाष्य केलं. बाळासाहेबांचे विचार घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप जात आहे. त्यामुळे आमच्या युतीला जनतेने कौल दिला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याचं ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून स्पष्ट झालं आहे, असंही ते म्हणाले.

संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर काल सुनावणी झाली. त्यासाठी त्यांना सत्र न्यायालयात आणण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राज ठाकरे यांनी भाजपाला उमेदवार मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. हे आवाहन स्क्रिप्टेड असल्याचं संजय राऊत यांनी काल म्हटलं होतं. त्यानंतर शहाजी पाटलांनी ही टीका केली आहे.

हे ही वाचा :

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी भाजपच्या टार्गेटवर, आ.रोहित पवारांचा गंभीर आरोप

राज्य सरकार शंभर रुपयांत तेल, रवा, डाळी देणार? या योजनेचं नेमकं झालं काय? – अजित पवार संतापले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version