spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Sanjay Raut: तुरुंगातून बाहेर येताच राऊतांनी केलं फडणवीसांचं कौतुक, मोदी- शाहांची भेटही घेणार

शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल तब्बल १०३ दिवसांनी जेलमधून जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर आज सकाळी पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची काल तब्बल १०३ दिवसांनी जेलमधून जामिनावर मुक्तता झाली. त्यानंतर आज सकाळी पहिल्यांदाच त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपले जेलमधले काही अनुभव सांगितले आहेत. तसंच त्यांनी आपण सावरकर, टिळक यांच्याप्रमाणे जेलमध्ये राहिलो असल्याचंही सांगितलं. तुरुंगातील यातना कुणाच्याही वाट्याला येऊ नये. तुरुंगात राहणं फारच कठिण असतं, असं सांगतानाच लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी सांगितलं. माझ्यावर काय अन्याय झाला याची तक्रारच मोदी आणि शहांकडे करणार असल्याचंही राऊत यांनी सांगितलं.

संजय राऊत यांची बुधवारी संध्याकाळी तुरुंगातून सुटका झाली होती. त्यांची सुटका झाल्या झाल्या त्यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. तसेच कोर्टाच्या निर्णयावर टिप्पणी करणार नाही. कोर्टाच्या आदेशाने देशात मोठा संदेश गेला आहे. माझ्या मनात कोणाविरोधात राग नाही. माझ्याविरोधात कारस्थान करणाऱ्यांना आनंद वाटत असेल तर त्यांच्या आनंदात सहभागी आहे असेही त्यांनी म्हटले. या सरकारला विरोधाला विरोध करणार नाही. काही निर्णय चांगले घेतले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हाडाला परत अधिकार दिले आहेत. आमच्या सरकारने हे अधिकार काढले होते. असे काही चांगले निर्णय सरकारने घेतले असल्याचे सांगत राज्य सरकार उपमुख्यमंत्री चालवत असल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय कटुता संपवण्याबाबत वक्तव्य केले होते. त्याचेदेखील स्वागत करत असल्याचे राऊत यांनी म्हटले. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक करतानाच त्यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं. मी सर्वांना भेटणार आहे. मी फडणवीस यांनाही दोन-तीन दिवसात भेटणार आहे. लोकांची काही कामे आहेत. माझा भाऊ आमदार आहे. त्यांच्या मतदारसंघातीलही कामे आहेत. त्यामुळे मी फडणवीस यांची भेट घेणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी म्हटले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहे. पवारांसोबत दूरध्वनीवरून चर्चा झाली आहे. त्यांची प्रकृती बरी नाही. त्यांचीही भेट घेणार असल्याचे राऊत यांनी म्हटले. येत्या काही दिवसांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीदेखील भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.

पंतप्रधान हे देशाचे असतात, एका कोणत्याही पक्षाचे नसतात. मी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून आपल्यासोबत काय घडले, कारस्थान कसे रचले गेले याची माहिती देणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत यांनी कारागृहात एकाकीपण येत असल्याचे सांगितले. कारागृहात एकाकीपणा वाढतो. कारागृहात भितींशी बोलावे लागते असेही त्यांनी सांगितले. स्वातंत्र्य चळवळीत, आणीबाणीत अनेकजण तुरुंगात गेले होते. राजकीय आयुष्यात तुरुंगात जावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

मी खासदार आहे. मी सरकारी कामासाठी कुणाला भेटू शकतो. माझा भाऊ आमदार आहे. कोणत्या कामासाठी भेटू शकत नाही का? हा महाराष्ट्र आहे. इथे राजकारणी एकमेकांना भेटत असतात. मी तुरुंगात होतो. तेव्हा फडणवीस म्हणाले होते कटुता थांबली पाहिजे. त्यामुळे फडणवीस यांना भेटलं तर गैर काय? असं सांगतानाच भाजपच्या विरोधात लढाई सुरूच राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा :

Sanjay Raut : मोठी बातमी : अखेर संजय राऊत यांना जामीन मंजूर

Sanjay Raut : ‘फोनवर बोलताना उद्धव ठाकरेंच उर भरुन आला, मलाही भरुन आलं’, संजय राऊत भावुक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss