संजय राऊतांनी केली मोठी घोषणा, ठाकरे गट जम्मूत लढवणार विधानसभेच्या निवडणुका

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे सध्या जम्मूत आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत हे जम्मूला आले आहेत.

संजय राऊतांनी केली मोठी घोषणा, ठाकरे गट जम्मूत लढवणार विधानसभेच्या निवडणुका

ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत हे सध्या जम्मूत आले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी संजय राऊत हे जम्मूला आले आहेत. यावेळी संजय राऊत यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना चांगलेच सुनावले आहे. आणि तसेच यावेळी बोलताना संजय राऊत यांनी आणखी एक खुलासा केला आहे. आणि ते म्हणाले आहेत की शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सध्या जम्मूत आहेत. राहुल गांधींच्या भारत जोडोच्या यात्रेत संजय राऊत हे सहभागी झाले आहेत. यावेळी संजय राऊत म्हणाले आहेत की, काँग्रेसशिवाय कोणत्याही विरोधी पक्षाची आघाडी होऊ शकत नाही. एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रश्न नाही. काँग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे. देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व तळपताना दिसत आहे. लोकं त्यांना स्वीकारत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत याना शिंदे गटाच्या नेत्यांनी पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला त्या नेत्यांचाही संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. जम्मूवरही पाकिस्तानचे तोफगोळे पडत असतात. अतिरेक्यांचे हल्ले होत असतात. इकडे या म्हणजे कळेल. तिकडे बसून बोलणे ठिक आहे, असा जोरदार हल्लबोल यावेळी संजय राऊत यांनी केला आहे. पाकिस्तानात जाऊ ना. मोदी यांनी त्याच विषयावर मत मागितली आहेत. मोदींना पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानात आणणं जमलं नाही अन् आमच्या हातात सत्ता आली की पाकिस्तानात जाऊ शकतो. अखंड हिंदुस्थानाचं स्वप्नही पूर्ण करू, असं ते म्हणाले.

तसेच संजय राऊत पुढे म्हणाले, एकंदरीत तुम्ही पाहिलं असेल तर भारत जोडो यात्रेची चांगली वातावरण निर्मिती आहे. पक्ष म्हणून नाही पण देशात चांगला संदेश जात आहे. पठाणकोटला हजारो तरुण मशाली घेऊन निघाले होते. मशाली काय काँग्रेसचं चिन्हं नाही. ते शिवसेनेचं चिन्हं आहे. मलाही भरून आलं. देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागते, असं राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

धनुष्यबाण कुणाचा? आज होणार पुन्हा सुनावणी

शिवसेनेवर टीका करताना पंतप्रधान मोदींनी स्वतःच्या पक्षालाच दोष दिला! नाना पटोलेंचा हल्लाबोल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version